नांदेड सिटी परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पुणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी परदेशी तरुणींसह तिघींना ताब्यात घेण्यात आले. मसाज सेंटरच्या मालक, व्यवस्थापकासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : महंगाई पे हल्ला बोल ; काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली

या प्रकरणी मसाज सेंटर मालक मुंजा रामदास शिंदे (वय ३१ रा.वडगाव), योगेश पवार (रा.नांदेड गाव),व्यवस्थापक अथर्व प्रशांत उभे (वय १९ रा.धायरी, बेनकरवस्ती), ज्योती विपुल वाळिंबे ( वय ३० रा. नऱ्हे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे, उभे आणि वाळिंबेला अटक करण्यात आली आहे. नांदेड सिटी परिसरात डेस्टिनेशन सेंटर माॅलमधील ब्लू बेरी स्पा सेंटरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर घुले, महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, हवालदार ज्योती बांभळे, पूनम कांबळे, सीमा जगताप यांंनी मसाज सेंटरवर छापा टाकला.

हेही वाचा >>> पुणे : ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी ; तीन लाखांचा ऐवज लंपास ,कात्रजमधील घटना

मसाज सेंटरमध्ये तरुणींना जादा पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी तरुणीसह तिघींना ताब्यात घेण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune prostitution in the name of massage center in nanded city area pune print news amy