पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगवा तुमचा कागदी बाप्पा’ हा इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी विशेष असा उपक्रम हाती घेण्यात आला. गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे. उपक्रमाला सह्याद्री इंडस्ट्रीज, सुहाना आणि कॅम्लीन यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमात आज शिवाजी नगर येथील पुणे हँडमेड पेपर्स येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आपल्या कुटुंबीयांसोबत म्हणजेच पत्नी नेहा आणि मुलगी रेणुका यांच्या समवेत बाप्पाची कागदी मूर्ती रंगवून सहभागी झाले. यावेळी पुणे हँडमेड पेपर्सचे मंगेश मंगेश लोहपात्रे व शोभना हडप तसेच आर्ट पुणे फाऊंडेशनचे प्रियंवदा व संजीव पवार उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे : कुऱ्हाडीने मारहाण करीत पेट्रोलपंपावर दरोडा ; भूमकर चौकातील घटनेने खळबळ

Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Ajit Pawar vs Yugendra Pawar, Baramati, Baramati voters,
बारामतीत अटीतटीचा सामना, अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा

या उपक्रमांतर्गत रंगविण्यात येणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशमूर्ती अनोख्या असून, त्या ८०% कापूस-कागदाचा लगदा आणि २०% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केल्या जातात. महत्वाचे म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेला कागद हा वृक्षतोड करून तयार केलेला नसून, वापरलेल्या कागदाची गुणवत्ता सुधारुन म्हणजेच पेपर अपसायकल करून वापरला जातो. या मूर्ती वजनाने हलक्या असतात आणि जलरंगांनी रंगवता येतात. पुणे हँडमेड पेपर्सचे मंगेश लोहपात्रे यांच्या संकल्पनेतून या मूर्ती साकारल्या आहेत. सदर इको-फ्रेंडली गणेशमूर्ती शिवाजी नगर येथील पुणे हँडमेड पेपर्स येथे उपलब्ध असून त्याची किंमत रुपये १२५० पासून पुढे आहे. आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करू पाहणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच आहे. याबरोबरच पारंपारिक शाडूच्या गणेश मूर्ती देखील नेहमीप्रमाणे इथे उपलब्ध आहेत.

पुणे : विद्यापीठांनी परस्पर सहयोगाद्वारे तंत्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज ; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मत

यावेळी बोलताना राहुल देशपांडे म्हणाले, ” पर्यावरणपूरक गणेश मूर्ती रंगविण्याचा हा उपक्रम माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. अलीकडे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांमध्ये बरीच जागरुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः तरुणाई’मध्ये पर्यावरणाच्या रक्षणाबाबत जबाबदारीची जाणीव वाढली आहे. या उपक्रमात तरुणाईचा उस्फूर्त सहभाग हे याचे उत्तम उदाहरण आहे. आजच्या पिढीमध्ये ‘माझी पृथ्वी वाचविण्यासाठी माझ्या परीने शक्य ती गोष्ट करेन’ ही भावना जागृत झाली आहे आणि त्यातूनच ते अशाप्रकारच्या उपक्रमाशी जोडले जात आहे, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.’’

रंगवा तुमचा कागदी बाप्पा या उपक्रमात ६०० हून अधिक विद्यार्थी झाले. यात सिम्बायोसीस स्कील युनिव्हर्सिटी, मराठवाडा मित्र मंडळाचे आणि सिंहगड सहुमाचे आर्किटेक्चर कॉलेज, एसएनडीटी मुलींचे महाविद्यालय, सुहृद मंडळ आणि स्वरूप वर्धिनी येथील मुलांचा सहभाग होता. येत्या काही दिवसात महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत.