पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगवा तुमचा कागदी बाप्पा’ हा इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी विशेष असा उपक्रम हाती घेण्यात आला. गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे. उपक्रमाला सह्याद्री इंडस्ट्रीज, सुहाना आणि कॅम्लीन यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमात आज शिवाजी नगर येथील पुणे हँडमेड पेपर्स येथे राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आपल्या कुटुंबीयांसोबत म्हणजेच पत्नी नेहा आणि मुलगी रेणुका यांच्या समवेत बाप्पाची कागदी मूर्ती रंगवून सहभागी झाले. यावेळी पुणे हँडमेड पेपर्सचे मंगेश मंगेश लोहपात्रे व शोभना हडप तसेच आर्ट पुणे फाऊंडेशनचे प्रियंवदा व संजीव पवार उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in