पुणे : धनकवडी भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींकडून २२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी अजय शिरसाठ (वय ४८, रा. धनकवडी), किरण किसन कानकर (वय ३२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी), गणेश कदम (वय ३५, रा. पद्मावती), दीपक दोडे (वय ५५, रा. बिबवेवाडी), दादासाहेब जोगदंड (वय ३५,रा. पद्मावती), बसू सिगली (रा. मार्केट यार्ड), अर्जुन थोरात (वय ४९, रा. धनकवडी), बबन कांबळे (वय ५२, रा. बिबवेवाडी), उत्तरेश्वर साठे (वय ५५, रा. आंबेगाव), चंद्रकांत बाड (वय ३५, रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस शिपाई श्रीकांत दगडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
हेही वाचा – शहरबात : नाकाबंदीचे फलित
धनकवडी भागातील नसरवान पेट्रोल पंपाजवळ मटका अड्डा सुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २२ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच, तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव तपास करत आहेत.