पुणे : पुणे स्थानकावरील सरकते जिने वारंवार बंद पडणे, प्रवाशांसाठी पुरेसे दिशादर्शक फलक नसणे, स्थानक परिसरातील वाहनतळाची समस्या, पुणे -मुंबई गाड्यांचा वेग वाढविणे आदी मुद्द्यांवर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत अनेक वर्षे चर्चा होत आहे. नुकत्यात झालेल्या बैठकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यावर रेल्वे प्रशासनानेही कार्यवाहीचे नेहमीप्रमाणे आश्वासन दिले. त्यामुळे प्रत्यक्षात कार्यवाही कधी होणार, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

हेही वाचा >>> राज्यातील डोळ्यांची साथ ओसरली; मुंबई- पुण्यात एकही नवीन रुग्ण नाही

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक नुकतीच विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे होत्या. बैठकीला निखिल काची, सुरेश माने, गोपाल तिवारी, बशीर सुतार, देवदत्त निकम, लालचंद ओसवाल, आप्पासाहेब शिंदे, अजित चौगुले, किशोर भोरावत, दिलीप बटवाल, शिवनाथ बियाणी सदस्य उपस्थित होते.

पुणे स्थानकावर पुरेशा संख्येने दिशादर्शक बसविणे, लिफ्ट आणि सरकते जिने बंद पडू नयेत, याची काळजी घणे, सीसीटीव्ही, सुरक्षा, वाहनतळाची समस्या दूर करणे, प्रवासी सुविधा विकसित करणे, रेल्वे परिसर अतिक्रमणमुक्त करणे आदी मुद्दे मांडण्यात आले. यावर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. असे असले तरी प्रत्येक बैठकीत त्याच मुद्द्यांवर चर्चा होत असून, त्यावर कार्यवाही होत नसल्याबद्दल प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा >>> तुळशीबाग गणपती आता जाणार सातासमुद्रापार,जर्मनीमधील महाराष्ट्र मंडळात होणार प्रतिष्ठापना

रेल्वे सुरक्षित आणि वेळेवर धावणे, लोहमार्गांची योग्य देखभाल करणे, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात आहेत. रेल्वेची विकासकामे, प्रवासी सुविधांचा विस्तार आणि महसूल वाढीसाठी सदस्यांनी सहकार्य करावे.

– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे विभाग

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना सातत्याने पोहोचण्यास विलंब होत आहे. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या गाड्यांचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे.

– निखिल काची, सदस्य, विभागीय सल्लागार समिती

बैठकीत सदस्यांनी मांडलेले मुद्दे

– पुणे-कोल्हापूर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करा

– मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा

– मिरज ते कोल्हापूर सकाळी गाडी सुरू करा

– पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसला चिंचवड येथे थांबा

– पुणे-लोणावळा दरम्यान लोकलची संख्या वाढवणे – पुणे-अहमदाबाद, पुणे-भुज, पुणे-बिकानेर, दौंड-इंदूर आणि दर्शन एक्स्प्रेस गाड्या कोल्हापूर, मिरजपर्यंत विस्तारित करा