पुणे : रेल्वे प्रवाशाला तातडीची वैद्यकीय मदत आता स्थानकातच उपलब्ध होत आहे. यासाठी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू आहे. या कक्षात गेल्या पाच महिन्यांत ६१८ रुग्णांवर आपत्कालीन स्थितीत उपचार करण्यात आले आहेत. याचबरोबर १० प्रवाशांना प्राथमिक उपचार करून त्याला नजीकच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आपत्कालीन वैद्यकीय कक्ष चालविण्याचे कंत्राट रुबी हॉल रुग्णालयाला देण्यात आले आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्याशेजारील जागेत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरू झाला. या कक्षाच्या माध्यमातून नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यांत कक्षात ६१८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. या कक्षात दरमहा शंभरहून अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या पाच महिन्यांत रेल्वे गाडीत अथवा फलाटावर जाऊन २१९ रुग्णांवर उपचार करण्यात आले. याचबरोबर ३९९ रुग्णांनी कक्षात येऊन उपचार घेतले आहेत, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. संजीव तांदळे यांनी दिली.

passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
viral video girl lost balance while get in the moving train will be shocked to see what happened next
भयंकर! वेफर्स घ्यायला प्लॅटफॉर्मवर उतरली अन् तेवढ्यात ट्रेन सुरु झाली; तरुणीनं पुढे काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल
work of Gavhan station is incomplete
गव्हाण स्थानकाचे काम अपूर्णच! लोकल स्थानकात थांबण्याची प्रवाशांना अद्याप प्रतीक्षाच
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली

हेही वाचा : राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त सारसबाग परिसरात वाहतूकबदल…काय आहे व्यवस्था ?

रेल्वे गाडीत चढताना अथवा उतरताना अथवा इतर अन्य कारणांमुळे जखमी झालेल्या प्रवाशांवर या कक्षात मोफत प्रथमोपचार केले जात आहेत. याचबरोबर आजारी असलेल्या प्रवाशांवर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या दरांनुसार उपचार केले जात आहेत. आपत्कालीन वैद्यकीय कक्षात औषध विक्री केंद्र सुरू करून कक्ष चालविणाऱ्या संस्थेला उत्पन्न मिळविता येत आहे, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी दिली.

रेल्वे प्रवासादरम्यान दुखापत झालेले रुग्ण प्रामुख्याने आपत्कालीन वैद्यकीय कक्षात उपचारासाठी येत आहेत. याचबरोबर काही दिवसांपूर्वी एका गाडीमध्ये प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली होती, त्यावेळीही कक्षातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन उपचार केले.

डॉ. बेहराम खोडाईजी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रुबी हॉल क्लिनिक

हेही वाचा : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

असा आहे आपत्कालीन वैद्यकीय कक्ष…

  • आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू
  • कक्षात एक डॉक्टर, दोन परिचारिका
  • इसीजी, डिफ्रिबिलेटर, नेब्युलायझर आदी सुविधा
  • जीवनावश्यक औषधे उपलब्ध
  • प्रथमोपचार मोफत, तर इतर उपचार अल्प दरात
  • नजीकच्या सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका