पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात वाहन निर्मिती क्षेत्रातील उद्योगांमधील नव्याने निर्मित वाहने देशभरात पोहोचविण्यासाठी पुणे रेल्वेची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. पुणे रेल्वेने नव्या वाहनांच्या वाहतुकीचा यंदा नवा विक्रम केला आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये एकाच महिन्यात पुण्यातून नव्या वाहनांच्या तब्बल ८६ मालगाड्या देशभरातील बाजारपेठेत पाठविण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाहन क्षेत्राकडूनही आता रस्ते वाहतुकीऐवजी नव्या वाहनांच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या पर्यायाला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, स्कोडा, वोक्सवैगन आदी कंपन्यांचा त्यात सहभाग आहे. पुणे रेल्वेकडून गेल्या अनेक वर्षांपासून पुणे विभागातून विविध वस्तूंची देशभरात वाहतूक केली जाते. त्यात साखर आणि इतर आवश्यक वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. त्यात आता पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात उत्पादित होणाऱ्या नव्या वाहनांचाही सहभाग मोठा आहे. या उद्योगांमधून पुणे रेल्वेने देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर बांगलादेशातही नव्या वाहनांची वाहतूक केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्या वाहनांच्या वाहतुकीचे नवनवे विक्रम पुणे रेल्वेकडून करण्यात येत आहेत. त्यातील नवा विक्रम डिसेंबरमध्ये झाला.

हेही वाचा – “तो माझा उद्धटपणा…”, सुप्रिया सुळेंचं गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर

पुणे रेल्वेकडून प्रामुख्याने चिंचवड, खडकी आणि लोणी स्थानकावरून नवी उत्पादित वाहने देशभरात पोहोचविण्याची व्यवस्था आहे. या स्थानकांवर वाहने रेल्वेच्या डब्यांमध्ये पोहोचविण्याची विशेष यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे वाहनांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी विशेष डबेही तयार करण्यात आले आहेत. डिसेंबरमध्ये या स्थानकांवरून तब्बल ८६ मालगाड्यांमधून नवी वाहने देशभरातील बाजारपेठांमध्ये पाठविण्यात आली. त्यातून पुणे रेल्वेला १३ कोटी ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, अशी माहिती पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली. यापूर्वीचा एका महिन्यातील नव्या वाहनांच्या वाहतुकीचा विक्रम गेल्या वर्षातील एप्रिलमध्ये ६६ मालगाड्यांचा होता. डिसेंबरमधील वाहतुकीमुळे हा नवा विक्रम तयार झाला आहे. पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे, अपर व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्निल निला यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे व्यवसाय विकास पथकाच्या प्रयत्नांतून हा विक्रम करण्यात आला आहे.

करोनातील निर्बंधात रेल्वेला लाभ

पुणे रेल्वेकडून परिसरात उत्पादित नव्या वाहनांची वाहतूक पूर्वीपासून करण्यात येत होती. मात्र, करोनातील निर्बंधात ही वाहतूक वाढली. करोनामध्ये सुरुवातीच्या काळात रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद होती. रेल्वेकडून प्रवासी वाहतूक बंद असल्याने माल वाहतुकीवर भर देण्यात आला होता. अशातच उद्योगांनी माल वाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य दिले. सुरक्षित आणि वेळेत वाहतुकीमुळे रेल्वेकडे नव्या वाहनांची वाहतूकही वाढली. त्यात रेल्वेच्या व्यवसाय विकास पथकाचाही मोठा वाटा आहे.

हेही वाचा – हिंदी राष्ट्रभाषा नाही, राज्य सरकारकडून दुरुस्ती; हिंदी साहित्य अकादमी पुनर्रचनेचा सुधारित अध्यादेश काढला

चिंचवड स्थानकाचा वाटा मोठा

रेल्वेकडून वाहनांच्या वाहतुकीसाठी चिंचवड, खडकी आणि लोणी काळभोर स्थानकात विशेष व्यवस्था आहे. या ठिकाणांहून टाटा मोटर्स, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, स्कोडा, वोक्सवैगन आदी कंपन्यांत तयार झालेली वाहने रेल्वेतून देशभरातील बाजारपेठांत पाठविली जातात. डिसेंबरमध्ये एकूण ८६ मालगाड्यांतून नवीन वाहने पाठविण्यात आली. त्यातील ५३ गाड्या एकट्या चिंचवड येथून सोडण्यात आल्या आहेत.