पुणे : सध्या उन्हाळी सुट्यांच्या हंगाम सुरू असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक गाड्यांना मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. याअंतर्गत आता पुणे-इंदूर ही विशेष गाडी सोडली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे-इंदूर ही साप्ताहिक गाडी असून, तिच्या १४ फेऱ्या होणार आहेत. पुणे स्थानकावरून ही गाडी १९ मे ते ३० जून या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी पुण्यातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी इंदूरला पोहोचेल. इंदोरमधून ही गाडी १८ मे ते २९ जून या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी इंदूरमधून दर गुरूवारी सकाळी ११ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ३ वाजून १० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.

हेही वाचा >>> पुणे : आता तुळशीबागेत निर्धास्त खरेदी करा… तुळशीबाग व्यापारी संघटना आणि विश्रामबाग पोलिस ठाण्याची नवी योजना

या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, वलसाड, सुरत, बडोदा जंक्शन, गोध्रा, रतलाम, नागदा, उज्जैन आणि देवास हे थांबे आहेत. या गाडीसाठीचे आरक्षण सर्व आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून करता येईल, असे मध्ये रेल्वेने कळविले आहे.

मुंबई ते कलबुर्गीदरम्यान सुपरफास्ट विशेष गाडी

मध्य रेल्वेने मुंबई ते कलबुर्गी अशी एकेरी सुपरफास्ट विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १७ मे रोजी रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही गाडी त्याच दिवशी सकाळी १- वाजून ३० मिनिटांनी कलबुर्गी येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पुणे, दौंड, कुर्डुवाडी आणि सोलापूर हे थांबे आहेत. या गाडीचे आरक्षण सुरू झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune railways to run summer special trains to reduce the rush of passengers pune print news stj 05 zws
First published on: 14-05-2023 at 18:44 IST