पुणे शहर तसेच परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांच्या घरात, दुकानांत पाणी साचले आहे. या मुसळधार पावसात एक नागरिक जखमी झाल्याचीही माहिती आहे. एका रात्रीत झालेल्या या पावसामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. गेली पाच वर्षे पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. भाजपाने पाच वर्षांत केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. सोबतच त्यांनी पुण्यातील रस्त्यांचे काही फटोही समाजमाध्यमावर प्रदर्शित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना ; अग्निशमन दलाकडून पावसात अडकलेल्या १२ जणांची सुखरुप सुटका

“पुणे शहरात रस्त्यांच्या अक्षरशः नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्षे पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्षे पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे,” असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> समृद्धी महामार्ग : दिवाळीआधी राज्यातील जनतेला शिंदे सरकारकडून मोठं गिफ्ट? पंतप्रधान कार्यालयाच्या उत्तराची प्रतिक्षा

पुणे शहरातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसरात, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर, हडपसर, गाडीतळ, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम, कसबा पेठ, फिश मार्केट जवळ, कुंभारवाडयासमोर, नारायण पेठ, मोदी गणपती, औंध, डिएव्ही स्कुल गल्ली, कसबा पेठ, पवळे चौक, कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मित्रमंडळ चौक, गंज पेठ, भवानी पेठ या भागात राहणार्‍या नागरिकांचे जोरदार पावसामुळे प्रचंड हाल झाले. तेथील अनेक सोसायटी, काही घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस जबाबदार; महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना खासदाराचं पत्र

काल रात्रभर झालेल्या पावसामुळे येथील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर झालेले हे नुकसान पाहून पुणेकर हतबल झाले आहेत. दरम्यान, आज (१८ ऑक्टोबर) पुन्हा एकदा येथे पावसाला सुरुवात झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rain update ncp leader jayant patil criticize bjp prd