Pune Rain Update : पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, सिंहगडमधील निंबजनगर येथी दुकानांमध्ये पाणी शिरलं असून दुकानदारांचं लाखोंचं नुकसान झालं आहे. यातील काही महिलांनी टीव्ही ९ शी संवाद साधला असून त्यांनी प्रशासनाकडे मदतीचं आवाहन केलं आहे.

खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ३५५७४ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात १०० मिलिमीटर आणि घाटमाथ्यावर २०० मिलिमीटरपेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार विसर्ग पुन्हा (Pune Rain) वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या गृहनिर्माण सोसायटी पाण्याखाली गेल्या आहेत.

footpaths of Lakshmi Road are once again crowded with street vendors and vehicles
लक्ष्मी रस्त्याचा श्वास पुन्हा कोंडला…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
eknath khadse devendra fadnavis
उलटा चष्मा : पांढरे निशाण…
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
municipal administration sent stop work notice to developer in Kandivali for not complying with air pollution norms
पर्यावरणाचे नियम धाब्यावर, कांदिवलीतील विकासकाला पुन्हा नोटीस

हेही वाचा >> Mumbai Pune Rain Live Updates : मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढला, पुण्याला पाण्याचा विळखा!

आम्हाला नुकसान भरपाई द्या

दुकान पाण्याखाली (Pune Rain) गेलेल्या एका पीडित दुकानदार महिलेने सांगितलं की, “आम्ही येथे राहायला आल्यापासून पहिल्यांदाच पाणी भरलं आहे. आमचं खूप नुकसान झालंय. आमचं सगळं यावरच चालतं. आम्हाला काहीतरी भरपाई द्यावी लागेल. त्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. उदरनिर्वाहासाठी आमच्याकडे दुसरं काहीच नाही. दुकानात माल भरपूर होता. हा लोकांचा माल आहे. त्यामुळे आम्हाला आता भरपाई द्यावी लागेल.” तर, दुसऱ्या महिलेला प्रतिक्रिया देताना अश्रू अनावर झाले होते. पदराचा कोपरा डोळ्यांना लावून, “आमचं लाखोंचं नुकसान झालंय. आमचं सगळं यावरच चालतं. आम्हाला कोणीतरी नुकसान भरपाई द्यावी” असं ती महिला म्हणाली.

पुण्यात पावसाचा जोर वाढला

पुण्यातील पूरस्थिती पाहता अनेक नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर, शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, जयंतराव टिळक पूल आणि होळकर पूल परिसर या ठिकाणी जाण्यास नागरिकांना प्रतिबंध करण्यात आला आहे, असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून कळवण्यात आले आहे.

नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

पूर परिस्थितीत (Pune Rain) पुणे महापालिकेचे अग्निशमन दल शहराच्या नदीकाठच्या विविध भागात अडकलेल्या पुणेकरांनी सुरक्षित स्थळी पोहोचवत आहे, अशी माहिती खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह वीस अग्निशमन अधिकारी आणि जवळपास तीनशे जवान विविध ठिकाणी कार्यरत आहेत, असंही ते म्हणाले.

Story img Loader