पुणे शहराला सोमवारी रात्री पावसाने झोडपले. ढगफुटीसदृश पावसाने पुण्यात हाहाकार उडवून दिला. शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. सकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाणी साचून होतं. पुणे शहरात दोन तासात १०५ मिमी इतका रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. पुणे शहराला आज यलो अलर्ट देण्यात आला असून, संध्याकाळी ६० मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. याच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांनी या विषयावरुन सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत टीका केल्यानंतर विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहर तुंबण्यासाठी राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

पाच वर्षात पुण्याच्या शिल्पकारांनी जो विकास केलाय तो कालच्या पाण्यात वाहून गेलाय अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे असा संदर्भ देत पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुणे तुंबण्यासाठी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याचं म्हटलं. “विरोधकांना टीका करायचीच असते. त्याबद्दल मला वेगळं काही म्हणायचं नाही. जयंतरावांना यापेक्षा वेगळं काय म्हणायचं असतं?” असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटलांनी केला.

नक्की वाचा >> …अन् भाजपाचा उल्लेख असणारा ‘तो’ प्रश्न ऐकून चढ्या आवाजातच अजित पवार पत्रकाराला म्हणाले, “३२ वर्षे झाली मी…”

“गेल्या अडीच वर्षात तुमचं सरकार होतं. पुण्यात भाजपाची सत्ता होती तरी पालकमंत्री म्हणून तुम्ही कसा काटा लावलेला, कसा हूक लावलेला याची बरीच उदाहरणं आहेत. पालकमंत्री म्हणून तुम्ही महानगरपालिकेला आदेश देऊन खूप गोष्टी करुन घ्यायला हव्या होत्या. त्या का नाही करुन घेतल्या? सत्ता आमची असली तरी पालकमंत्र्यांना अधिकार असतात,” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अप्रत्यक्षपणे पुण्यातील पाणी तुंबण्यावरुन माजी पालकमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका केली. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> संजय राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी केली चित्रा वाघ यांची नक्कल; BJP उपाध्यक्षांना लक्ष्य करताना म्हणाले, “पूजा चव्हाणला…”

“अजित पवार हे अडीच वर्ष पुण्याचे पालकमंत्री होते. पुण्यामध्ये भाजपासाठी सत्ता असूनही त्यांनी पालिकेला कसं दमवलं आहे याची मोठी उदाहरणं आहेत. पालकमंत्र्यांना अधिकार असतात मग तुम्ही जसं दमलं तसं गटार साफ करुन घ्या, नाले साफ करुन घ्या असं तुम्ही करुन घ्यायला हवं होतं. तसं तुम्ही केलं नाहीत,” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

नक्की वाचा >> “अमित शाहांचा फोन आला आणि ते म्हणाले, तुम्ही सांगताय ते…”; चंद्रकांत पाटलांनी सांगितला कोथरुडमधून तिकीट मिळाल्याचा किस्सा

“आता तुम्ही काल पायउतार झाल्यानंतर आज लगेच आरोप करताय. मी काही पाणी तुंबण्याचं समर्थन करत नाही. नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल मी संवेदनशील आहे. मी पुण्याचे सीपी आणि आयुक्तांना अशी विचारणा केली आहे की वेळ पडली तर आपल्याला पुणे विद्यापिठातील एनएसएस युनिटची मदत घेता येईल का? मॅन पॉवरची सध्या गरज आहे. त्यावर सीपींनी काम सुरु असल्याचं सांगितलं. लोकांना जवळच्या निवारास्थानावर हलवण्याचं काम सरु आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.