पुणे शहराला सोमवारी रात्री पावसाने झोडपले. ढगफुटीसदृश पावसाने पुण्यात हाहाकार उडवून दिला. शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले, अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. सकाळपर्यंत अनेक ठिकाणी पाणी साचून होतं. पुणे शहरात दोन तासात १०५ मिमी इतका रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. पुणे शहराला आज यलो अलर्ट देण्यात आला असून, संध्याकाळी ६० मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. याच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांनी या विषयावरुन सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत टीका केल्यानंतर विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहर तुंबण्यासाठी राष्ट्रवादीच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा