पुणे : शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी खडकी पोलिसांनी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखला. पीडित तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन खडकी कटक मंडळाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांच्यासह दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या प्रकरणी दिक्षांत गौतम चव्हाण (वय २२, रा. रेंजहिल्स, खडकी) याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ख़डकी कटक मंडळाचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर आणि डाॅन नावाच्या एका आरोपीच्या विरुद्ध तरुणीशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती खडकी पोलिसांनी दिली. याबाबत एका पीडित तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे: शेजाऱ्यांच्या त्रासामुळे विवाहित महिलेची आत्महत्या

दिक्षांत चव्हाणने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. आई-वडिलांना तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून चव्हाणने तरुणीला घरी बोलावले. तरुणी घरी आल्यानंतर चव्हाणने तिला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. ती बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. मोबाइल कॅमेऱ्याद्वारे त्याने तरुणीची छायाचित्रे काढली. त्यानंतर तरुणीला त्याने धमकावले. माझ्याशी विवाह केला नाही तर समाजमाध्यमात छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर चव्हाणने तरुणीला धमकावून बलात्कार केला. त्यानंतर त्याने तरुणीला विवाहास नकार दिला.

दुर्योधन भापकर यांनी तरुणीला धमकावले. ध्वनिचित्रफीत आणि छायाचित्रे माझ्याकडे असल्याचे सांगून तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर डाॅन नावाच्या एका व्यक्तीने तिला धमकावले. तू कोणाच्या नादी लागते. भापकर कोण आहेत, हे तुला माहीत आहे का?, असे सांगून तिला धमकावले. पाच हजार रुपये घे आणि विषय संपवून टाक, अशी धमकी डाॅन नावाच्या आरोपीने दिल्याचे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.