विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत येरवडा पोलिसांनी एकास अटक केली आहे. साहील सत्यवान आल्हाट (वय २२, रा. गांधीनगर, येरवडा) याच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी आणि आल्हाट ओळखीचे आहेत. आल्हाटने तरुणीशी मैत्री केली. तिला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. तरुणीवर त्याने बलात्कार केला. आल्हाटने त्याच्या नात्यातील एका महिलेच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

तरुणीने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. आल्हाटला न्यायालायने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पोलीस उपनिरीक्षक गलांडे तपास करत आहेत.