पुणे : राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने वार्षिक बाजारमूल्य दरात (रेडीरेकनर) यंदा कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट केलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीचेच दर सन २०२३-२४ या वर्षाला लागू असणार आहेत. यंदा रेडीरेकनर दर जैसे थे ठेवण्यात आले असले, तरी नेहमीप्रमाणे शहरातील कोरेगाव पार्क भागाने सर्वाधिक दर असण्याची परंपरा कायम राखली आहे.

मेट्रो प्रकल्पामुळे विष्णुशास्त्री चिपळूणकर (विधी महाविद्यालय) रस्त्यालगत असलेल्या कांचनगल्ली, अशोकपथ परिसर हा भाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर प्रभात रस्त्यावरील काशिनाथ शास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक १५) आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गावरील पौडरस्ता आणि कर्वे रस्ता या परिसरातील दर तेजीत आहेत.

RTO officials fined over 40 Dombivli rickshaw drivers between 5,000 to 20,000 rupees.
डोंबिवलीत १२५ हून अधिक रिक्षा चालकांची ‘आरटीओ’कडून तपासणी, ४० हून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Accident News :
Accident News : कंटेनर कारवर पलटी होऊन भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
pimpri traffic police cctv camera surveillance
नियम मोडताय सावधान! ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून वाहनचालकांची तपासणी; तीन कोटी दंड वसूल
Pune City School , Student Transport Pune ,
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक, ‘आरटीओ’ कारवाई करणार ?
Pedestrian, Pedestrian Day Pune, Pune,
पुणे : पादचारी दिनासाठी शहरातील इतक्या चौकांमध्ये फक्त रंगरंगोटीच !
The number of accidents in ST Corporation is highest this year
एसटी महामंडळात यंदाच्या वर्षी अपघाताचे प्रमाण सर्वाधिक ! सहा वर्षांची तुलना, प्रवाश्यांचा वाली कोण?
pune Municipal Corporation started removing illegal advertisement boards and banners placed in various main roads of city
अनधिकृत ७४० जाहिरात फलक काढले अन् वसूल केला इतक्या लाखांचा दंड !

हेही वाचा… पुणे: सिंबायोसिस आंतराराष्ट्रीय विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन

कोरेगाव पार्क आणि प्रभात रस्ता या परिसरातील दर हे नेहमी रेडीरेकनरच्या दरात आघाडीवर असतात. कोरेगाव पार्कमधील रेल्वे ओलांडणी पूल (ओव्हर ब्रीज) ते बंडगार्डन पूल हा भाग दरामध्ये पहिल्या स्थानावर असतो. या भागातील दर प्रति चौरस फूट १६ हजार ३९ रुपये आहेत. वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गात मेट्रो धावू लागल्याने या मार्गालगत असलेल्या प्रभाग रस्ता, विधि महाविद्यालय रस्त्यांबरोबरच कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील दर चढे आहेत. विधि महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या कांचनगल्ली, अशोकपथ परिसरात दर हे १५ हजार २८८ रुपये प्रति चौरस फूट आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रभात रस्त्यावरील काशिनाथ शास्त्री अभ्यंकर रस्ता (गल्ली क्रमांक १५) या भागातील दर १४ हजार ३१२ रुपये प्रति चौरस फूट आहेत. आयकर रस्त्यावरील दर १३ हजार ७१८ रुपये प्रति चौरस फूट आहेत.

हेही वाचा… पुणे महापालिकेच्या हद्दीतून फुरसुंगी- उरळी देवाची गावे वगळली, नगरपरिषदेची स्थापना; राज्य सरकारचा अध्यादेश

मेट्रो सुरू झालेल्या कर्वे रस्त्यावरील रेडीरेकनरचे दर चढे आहेत. या ठिकाणचे दर प्रति चौरस फूट १३ हजार ८३५ रुपये आहेत. पौड रस्त्यावरील दर ११ हजार ४८५ रुपये आहेत. तसेच कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी ते गरवारे महाविद्यालयापर्यंतचे दर १२ हजार ८३० रुपये आहेत.

शहरातील प्रमुख भागांमधील रेडीरेकनर दर

परिसर            दर (प्रति चौरस फूट)
बाणेर             ११,३०१
कात्रज            ६४२०
कोथरुड११,४८५
पर्वती            ११,२३०
सिंहगड रस्ता ६६०९
बालेवाडी९३३०
वडगाव खुर्द ७५०८
वडगाव बुद्रुक ६०७४
वारजे            ७३४०
बिबवेवाडी ८०५२
पाषाण             ९०४१
आंबेगाव खुर्द ५१६६
उंड्री             ६४०९
आंबेगाव बुद्रुक ५९३१
शिवणे            ४३६०
हडपसर७७६७
हिंगणे खुर्द६८६९
धनकवडी ५५००

मध्यवर्ती पेठांतील दर (प्रति चौरस फूट)

परिसर              दर (प्रति चौरस फूट)
कसबा पेठ            ६७२०
शुक्रवार पेठ            ७५७०
सदाशिव पेठ/नवी पेठ ९०५२
सोमवार पेठ            ७६५३
बुधवार पेठ             ८५६५
मंगळवार पेठ ८१६९
रविवार पेठ             ६०५५
रास्ता पेठ             ६६१८
गुरुवार पेठ             ७०२७
गंजपेठ            ६०६६
नाना पेठ             ६०८६
नारायण पेठ            ८२६३
शनिवार पेठ ८७४४

Story img Loader