पुणे : शहरात सोमवारी रात्री धुमाकूळ घातलेला पाऊस गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. शहराच्या आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगामुळे हा पाऊस झाला असून, त्याने शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडवला. पुण्याच्या मध्यवर्ती भागात शिवाजीनगर केंद्रावर १०५ मिलीमीटर, तर वडगाव शेरी भागात सर्वाधिक १३२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

हेही वाचा >>> Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी, एनसीबीच्या अहवालातून खुलासा

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’

पुणे शहर आणि परिसरामध्ये यंदाच्या चार महिन्यांच्या हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. सध्या महाराष्ट्रातून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. परतीचा पाऊस राज्याच्या विविध भागात धुमाकूळ घालतो आहे. पुणे शहर आणि परिसरामध्येही मोठा पाऊस होतो आहे. सोमवारी रात्री मात्र शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास शहराच्या आकाशात अकरा किलोमीटर उंचीचे प्रचंड मोठे ढग निर्माण झाले. दिवसभर ऊन असल्याने निर्माण झालेली स्थानिक वातावरणीय स्थिती आणि समुद्रातून येणारे मोठय़ा प्रमाणावरील बाष्प यामुळे मोठे ढग निर्माण झाले. ढगफुटीसाठी अशाच प्रकारचे ढग कारणीभूत ठरतात. पावणेदहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. घरे, सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले आणि अनेक नागरिक रात्री रस्त्यावर विविध ठिकाणी अडकून पडले. काही ठिकाणी झाडे, भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या. संपूर्ण शहरात रात्रभर पावसाने हाहाकार उडवून दिला. पहाटेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता.

हेही वाचा >>> तुमच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत…”

पुण्यात सोमवारी सुमारे दोन ते तीन तासांत अनेक भागात १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर केंद्रावर १०५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. यापूर्वी २०२० मध्ये या केंद्रावर ऑक्टोबरमध्ये एका दिवसात ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यापूर्वी २०११ मध्येही १०५ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला होता. पुण्यात मध्यवर्ती भागात २०१० मध्ये ऑक्टोबरमधील आजवरचा सर्वात मोठा पाऊस १८१ मिलिमीटर झाला होता. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरात एक ऑक्टोबरपासून गेल्या १८ दिवसांत २६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे १ जूनपासून शहरात झालेला पाऊस १००० मिलिमीटरच्या पुढे गेला आहे.  

वडगाव शेरीत १३२, पुरंदरमध्ये १३० मिलिमीटर

सोमवारी रात्री झालेल्या पावसामध्ये शहराच्या पूर्व भागातील पाऊस सर्वाधिक होता. यामध्ये वडगाव शेरी भागात १३२ मिलिमीटर, तर मगरपट्टा भागात ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पाषाणमध्ये ९४ मिलिमीटर, कोरेगाव पार्क भागात ९२ मिलिमीटर, लोहगावमध्ये ५४ मिलिमीटर आणि चिंचवडमध्ये ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यामध्येही पावसाचे प्रमाण मोठे होते. पुरंदरमध्ये १३० मिलिमीटर, तर बारामतीमध्ये १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.

दोन दिवसांत जोर कमी होणार 

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे. पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे सध्या पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास आणखी काही विलंबाने होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

तीन ठिकाणी झाडे पडली 

हडपसर आकाशवाणी जवळ आणि  चंदननगरमधील बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले. पाषाण येथील लॉयला स्कूल येथे दुचाकीवर झाड पडले. अग्निशमन दलाची मदत पोहोचण्यापूर्वी जखमी दुचाकीस्वाराला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले होते.