पुणे : आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे सिंहगड रस्ता पोलिसांनी दाखल केले. सिंहगड रस्ता भागातील मानस सोसायटी ते क्रिस्टल कॅस्टल सोसायटी रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुरू आहे. ‘रहिवाशांना होणाऱ्या तसदी बद्दल क्षमस्व, भारतीय जनता पक्षाचे खडकवासाला मतदार संघाचे उमेदवार भीमराव आण्णा तापकीय यांच्या विकास निधीतून’ अशा आशयाचा फलक लावण्यात आला होता. फलकावर सौजन्य म्हणून सारंग भोसले असे नाव लिहिण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मतदान दिनाच्या गमतीजमती!

आचारसंहितेचा भंग ठरत असल्याने आचार संहिता भंग केल्या  प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुराग राजेशकुमार यांनी फिर्याद दिली आहे.  आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात आणखी एक गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.  परवानगी न घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदावर मयुरेश वांजळे यांच्या प्रचार कार्यालयामोर गाड्या उभ्या होत्या. गाड्यांवर पक्षाचे चिन्ह आणि छायाचित्र लावण्यात आले होते.  आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन मोटारचालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune registered two cases of violation of model code of conduct pune print news rbk 25 zws