लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेली ई-टॉयलेट्स बंद असल्यामुळे आणि ती सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नागरिकांनी स्वयंचलित स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे. बावधन येथील ई-टॉयलेट्सची स्वखर्चाने देखभाल-दुरुस्ती करण्याचा निर्णय सजग नागरिक कृणाल घारे यांनी घेतला असून, महापालिकेकडून त्यांना तशी परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्व साधने आणि मनुष्यबळ उपलब्ध असतानाही ई-टॉयलेट्सची देखभाल करण्यासंदर्भातील उपाययोजना करण्यास अपयशी ठरलेल्या महापालिकेची निष्क्रियता यामुळे अधोरेखित झाली आहे.

Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray over the project Print politics news
मोठ्या प्रकल्पातील गतिरोधक दूर केले; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Nana Patole question regarding the action to be taken against Rashmi Shukla
रश्मी शुक्लांना हटवण्यास एवढा वेळ का लागला? नाना पटोले यांचा सवाल
Pune Fire incidents, Diwali pune, pune,
पुणे : दिवाळीत ६० ठिकाणी आगीच्या घटना
nagpur pollution increased on diwali due to use of firecrackers
प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्पना हवेत ,कोट्यवधींच्या फटाक्यांचा आवाज व धूर
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी

शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता महिला आणि पुरुषांसाठीच्या स्वच्छतागृहांची कमतरता आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी स्वयंचलित ई-टॉयलेट्स शहराच्या विविध भागांत उभारण्यात आली. तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीतून हा खर्च करण्यात आला होता. या अत्याधुनिक ई-टॉयलेट्चे व्यवस्थापन आणि देखभाल-दुरुस्तीचे काम खासगी कंपनीला देण्यात आले होते. करोना संसर्ग कालावधीत या कंपनीबरोबरचा करार संपला आणि त्यानंतर ई-टॉयलेट बंद पडली. ई-टॉयलेट सेवेसाठी शुल्क आकारले जात असले, तरी टापटीप, सुरक्षितता, अत्याधुनिक सुविधा आदी कारणांमुळे या स्वच्छतागृहांचा वापर वाढला होता. मात्र त्यानंतर देखभाल-दुरुस्तीअभावी ही स्वच्छतागृहे बंद पडल्याचे चित्र पुढे आले होते. अद्यापही शहरात केवळ तीन ठिकाणची स्वच्छतागृहे सुरू असून, उर्वरित ठिकाणची स्वच्छतागृहे बंद असल्याची वस्तुस्थिती आहे. बावधन येथील ई-टॉयलेट्सच्या बाबतीतही हा प्रकार झाल्याने अखेर नागरिकांनी ते सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आणखी वाचा-पुणे: शहरातील कचरा प्रश्न पेटला, ‘स्वच्छ’बरोबरचा करार संपुष्टात

बावधन येथे महापालिकेकडून ई-टॉयलेट्स उभारण्यात आले होते. उद्यानालगत हे स्वच्छतागृह असल्याने त्याचा वापर होणे अपेक्षित होते. स्वच्छतागृह सुस्थितीत असतानाही ते महापालिकेकडून कुलूपबंद करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक नागरिक कृणाल घारे यांनी या सुविधेसाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला.

अतिरिक्त आयुक्त, आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर स्वच्छतागृह लवकरच सुरू करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. खासगी कंपनीकडून देखभाल-दुरुस्ती केली जाईल, त्या संदर्भातील निविदा काढण्यात येईल, असे उत्तर त्यांना देण्यात आले. मात्र त्यानंतरही स्वच्छतागृहाची सुविधा सुरू होत नसल्याने घारे यांनी त्याची देखभाल करण्याची तयारी दर्शविली. महापालिका आयुक्तांनीही त्याला प्रतिसाद दिला आणि त्यांच्याबरोबर करारनामा करून त्या संदर्भातील कार्य आदेश घारे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यांसाठी स्वच्छतागृहाची देखभाल घारे स्वखर्चाने करणार आहेत.

आणखी वाचा-पुणे : विवाहाविषयक संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

नागरिकांना उच्च दर्जाच्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न आणि अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे महापालिकेची निष्क्रियता अधोरेखित झाली आहे.

स्वच्छतागृह बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. ती टाळण्यासाठी त्याची देखभाल करण्याची तयारी दर्शविली आहे. महापालिकेकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. -कृणाल घारे, स्थानिक नागरिक, बावधन