लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पाणीबचतीसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने लाखो पुणेकरांना पाणी बंदनंतरचे काही दिवस पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, पाणीकपातीमध्येही महापालिकेकडून टँकरमाफियांसाठी पाणीच पाणी दिले जात असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवताना टँकर भरणा केंद्रही बंद ठेवण्याचा निर्णय असतानाही टँकर भरणा केंद्रातून राजरोसपणे टँकर भरले जात असून, टँकरमाफियांसाठी पायघड्या का, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी असल्याने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी १८ मेपासून सुरू झाली आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस शहराच्या अनेक भागांत अपुरा, कमी दाबाने आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. त्याबाबतच्या शेकडो तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून पुणेकरांसाठी पाणीबाणी सुरू आहे. त्या विरोधात नागरिक, संस्था आणि राजकीय पक्षांनीही आंदोलने केली आहेत. मात्र पाणीकपात केवळ पुणेकरांसाठीच मर्यादित असल्याचे आणि पाणीकपातीमध्ये टँकरमाफियांचे उखळ पांढरे होत असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा… ससूनमधील रुग्णांच्या रांगा कमी होणार; आता वेळीच उपचार

पाणीकपातीच्या निर्णयानुसार गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असताना महापालिकेच्या पद्मावती टँकर भरणा केंद्रांवर टंकरची लांबच लांब रांग लागल्याची तक्रार राष्ट्रवादी अर्बन सेलचे नितीन कदम यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. पाणीबचतीसाठी टँकर भरणा केंद्रही बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला होता. मात्र त्यानंतरही टँकर भरणा केंद्रांमधून टँकरला पाणीपुरवठा केला जात असून, पाणीकपातीचा निर्णय टँकरचालकांना लागू नाही का, अशी विचारणाही नितीन कदम यांनी केली आहे.

हेही वाचा… पुणे: बकरी ईदला जनावरांची वाहतूक करताय? आरटीओकडून अनेक निर्बंध

शहराची तहान भागविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दररोज एक हजार ४०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी धरणातून उचलण्यात येते. महापालिका हद्दीत नव्याने २३ गावांचा समावेश झाल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. प्रतिदिन एक हजार ४०० दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येत असतानाही शहराच्या अनेक भागात सध्या विस्कळीत, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. शहराच्या अनेक भागात सध्या पाणीटंचाई असून, पाणीकपातीचा निर्णय टँकरमाफियांसाठी घेतल्याचा आरोपही त्यामुळे होत आहे.

प्रामाणिकपणे मिळकतकर भरणारे पुणेकर पाण्यासाठी आटापिटा करत असताना आणि सहकार्याची भूमिका ठेवून प्रशासनाला मदत करत असताना टँकर माफियांसाठी पायघड्या घातल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. – नितीन कदम, अध्यक्ष, राष्ट्रवादी अर्बन सेल