पुणे: पुण्यातील मालमत्ता क्षेत्रात मागील महिन्यात तेजीचे वारे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत सात टक्के वाढ नोंदविण्यात आली. एकूण घरांच्या विक्रीत ५० लाख रुपयांपर्यंतच्या किमतीच्या घरांचा वाटा ५५ टक्के आहे. त्यामुळे ग्राहकांची सर्वाधिक पसंती परवडणाऱ्या घरांना असल्याचे समोर आले आहे.
नाइट फ्रँक इंडियाने पुण्याचा मालमत्ता क्षेत्राचा नोव्हेंबर महिन्याचा अहवाल जाहीर केला आहे. यात पुणे जिल्हा, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, नोव्हेंबरमध्ये एकूण १४ हजार ६०७ घरांची विक्री झाली. त्यांचे एकूण मूल्य १३ हजार ३४२ कोटी रुपये असून, त्यातून सरकारला ४७३ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले. घरांच्या विक्रीत २५ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांचे प्रमाण २२ टक्के आणि २५ ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण ३३ टक्के आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक मागणी असल्याचे समोर आले आहे. ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांची विक्री ३२ टक्के आहे. याचवेळी १ ते २.५ कोटी रुपयांपर्यंतची घरांची विक्री १२ टक्के आणि २.५ कोटी ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांची विक्री केवळ १ टक्का आहे. विशेष म्हणजे ५ कोटी रुपयांवरील एकाही घराच्या विक्रीची नोंद झालेली नाही.
हेही वाचा… कसबा पेठेत जुन्या लाकडी वाड्याला आग; सुदैवाने जिवीतहानी नाही
घरांच्या आकारमानाचा विचार करता ५०० ते ८०० चौरस फुटांच्या घरांना सर्वाधिक ४५ टक्के मागणी दिसून आली. त्याखालोखाल ५०० चौरस फुटांखालील घरांना २७ टक्के मागणी होती. याचवेळी ८०० ते १ हजार चौरस फुटाच्या घरांना १४ टक्के आणि १ हजार ते २ हजार चौरस फुटाच्या घरांना १२ टक्के मागणी नोंदविण्यात आली. २ हजार चौरस फुटांवरील घरांची मागणी केवळ २ टक्के असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.