पुणे : रेल्वेत तिकीट तपासनीस पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने एका निवृत्त लष्करी जवानाची १७ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका महिलेसह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी संजीवनी पाटणे (वय २७, रा. केदारी पेट्रोल पंपाजवळ, वानवडी), शुभम मोड (रा. येवलेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका निवृत्त जवानाने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजीवनी पाटणे हिने निवृत्त जवानाला रेल्वेत तिकिट तपासनीस असल्याची बतावणी केली होती. फिर्यादी यांची भाची आणि पुतणीला रेल्वेत नोकरी लावते, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले.

हेही वाचा…संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न ? या मंत्र्यांकडूनच संशय व्यक्त

फिर्यादी यांच्या भाचीला रेल्वेतील नियुक्तीचे बनावट पत्र दिले, तसेच पुतणी ला नोकरीस लावल्याबाबत पैसे भरल्याची बँकेची बनावट कागदपत्रे मोबाइलवर पाठविली. पाटणेने तिच्या पतीला गंभीर आजार असल्याचे सांगितले. ओैषधोपचाराच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. रेल्वेतील नोकरी आणि औषधोपचारासाठी १७ लाख २७ हजार रुपये घेतले. नोकरी न मिळाल्याने तिच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune retired army mancheated of rs 1727 lakh with fake railway job offer pune print news rbk 25 sud 02