Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यातल्या कल्याणी नगर भागात भरधाव वेगात आलेल्या पोर्शने मोटरसायकलवर असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांनाही चिरडलं. या अपघातात एका अश्विनीचा मृत्यू जागेवरच झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण त्याचेही प्राण वाचले नाहीत. पुण्यातल्या बड्या बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा पोर्श गाडी भरधाव वेगात चालवत होता. त्यावेळी कल्याणी नगर भागात हा अपघात घडला. आता या अपघातातील महत्त्वाची बाब समोर आली आहे.
अनिश आणि अश्विनी यांचा अपघात कसा झाला ते त्यांचा मित्र अकिबने सांगितलं
अनिश आणि अश्विनी यांच्यासह त्यांच्या इतर मित्रांनी अनेक दिवस एकत्र भेट झाली नसल्याने डिनर प्लान केला आणि पबमध्ये जायचं ठरवलं. त्यामुळे आम्ही सगळे पबमध्ये गेलो होतो. कल्याणी नगर भागात रेस्तराँ होतं. आम्ही तिथेच गेलो. पुढे काय घडणार आहे ते आम्हाला माहीतही नव्हतं. आम्ही सगळे घरी परतण्यासाठी बाहेर पडलो तितक्यात डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हा भीषण अपघात झाला. अनीश आणि अश्विनी यांचा मित्र अकीब मुल्लाने सांगितलं. माझ्या डोळ्यांसमोरून अजूनही तो प्रसंग जात नाही असंही अकीबने स्पष्ट केलं
अपघात कसा झाला ते देखील अकिबने सांगितलं
अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. पोर्शे कारने या दोघांना चिरडलं. पोर्शे कार चालवणारा कारचालक हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे. तो एका प्रतिथशय बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. या प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. पण त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून या मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. मात्र जो प्रसंग त्या रात्री घडला त्याबाबत अकिबने माहिती दिली आहे. अश्विनी आणि अनिश या दोघांना चिरडण्यात आलं. अश्विनीचा मृत्यू अपघाताच्या जागीच झाला. अनिश अवधियाला रुग्णालयात नेलं होतं पण तिथे त्याचा मृत्यू झाला असंही अकिबने सांगितलं आहे.
पोलिसांच्या पंचनाम्यात काय?
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जो पंचनामा केला त्यानुसार पोर्श टायकॅन या कारचा स्पीड अपघाताच्या वेळी ताशी १६० किमी होता. इतक्या वेगात जी धडक मोटरसायकलला दिली गेल्याने दोघांचाही मृत्यू झाला. कारचा स्पीड लॉक झाला होता. त्यानंतर आम्ही कारची नीट पाहणी केली तेव्हा शेवटचा वेग हा ताशी १६० किमी इतका होता हे आम्हाला समजलं असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा- Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
हा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर केलं होतं. तिथे पोलिसांनी या मुलाला प्रौढ मानून कारवाई केली जावी अशी मागणी केली होती. मात्र ती मागणी कोर्टाने फेटाळून लावली. काही अटींवर त्याला जामीनही मंजूर केला आणि जे काही त्याने पाहिलं त्यावर त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगितला. मात्र त्याच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. काही पत्रकारांशी संवाद साधताना अमितेश कुमार यांनी हेदेखील सांगितलं की जो गुन्हा त्या अल्पवयीन मुलाने केला आहे तो अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. त्या अल्पवयीन मुलाने हे मान्य केलं आहे की त्याला मद्यसेवन करण्याची सवय आहे. तसंच तो अजूनही अठरा वर्षांचा झालेला नाही तरीही त्याने भरधाव वेगात कार चालवली. त्याच्याकडे कार चालवण्याचा परवानाही नाही असंही अमितेश कुमार म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.