अविनाश कवठेकर

सततच्या रस्ते खोदाई आणि पावसामुळे पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, गेल्या दोन महिन्यांत डांबरी रस्त्यांवर १७ हजार १९३ खड्डे पडल्याची नोंद महापालिकेच्या पथ विभागाकडे आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डय़ांची माहिती महापालिका प्रशासनाकडे नाही. त्यामुळे खड्डय़ांची संख्या यापेक्षाही जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन महिन्यांत यातील १६ हजार ७४७ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी ‘खड्डेच खड्डे चोहीकडे’ असे चित्र शहरातील प्रमुख रस्त्यांवर आहे. खड्डय़ांमुळे वाहतुकीचा वेगही संथ झाला असून, पावसाळय़ापूर्वी खड्डे दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाने तब्बल ५५ कोटींचा खर्च केला असून, हा खर्चही खड्डय़ात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात एकूण १ हजार ३९८.६५ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे ९७०.८६ किलोमीटर, १२ ते १४ मीटर रुंदीचे ३१४ किलोमीटर, २४ ते ३० मीटर रुंदीचे ६०.५४ किलोमीटर, ३० ते ३६ मीटर रुंदीचे २९.९६ किलोमीटर, ३६ ते ६१ मीटर रुंदीचे २३.२९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा समावेश आहे. यातील डांबरी रस्त्यांची लांबी ९४४.१२ किलोमीटर एवढी तर २१०.३९ किलोमीटर लांबीचे काँक्रीटचे रस्ते आहेत.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Crime case against the couple, couple pushed traffic police, traffic police,
वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा, कारवाई टाळण्यासाठी बनावट वाहन क्रमांकाची पाटी
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
speeding bike hit police, pune, bike hit police,
पुणे : नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना भरधाव दुचाकीची धडक, दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीसह चौघे जखमी
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

गेल्या वर्षभरापासून महापालिकेच्या पथ विभाग, मलनिस्सारण, विद्युत विभागाबरोबरच मेट्रो मार्गिकेच्या कामांसाठी रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर खोदाई करण्यात आली. याशिवाय खासगी, अन्य शासकीय आणि निमशासकीय कंपन्यांकडूनही सेवा वाहिन्या टाकण्यासाठी वारेमाप रस्ते खोदाई करण्यात आली. ही कामे सातत्याने सुरू राहिल्याने रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली होती. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने ५५ कोटींचा खर्च केला होता. मात्र, पावसामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्याने हा खर्चही उधळपट्टी ठरला असून, ऐन पावसात पथ विभागाकडून रस्ते दुरुस्तीची तात्पुरती मलमपट्टी केली जात असून, रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लहान मोठे अपघातही होत असून, पावसाळय़ानंतर रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण केले जाणार असून, त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या १५ रोड मेन्टेनन्स व्हॅनद्वारे खड्डे दुरुस्ती केली जात आहे.