पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आजपासून पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीला प्रारंभ झाला. भाजप नेत्यांची उपस्थितीत बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय आणि सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी आचरण तसेच नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासंदर्भातही चर्चा होणार आहे. संघटनेचा विस्तार आणि विशेष उपक्रमांच्या माहितीचेआदानप्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिका-यांकडून देण्यात आली. या बैठकीस ३६ संघटनांचे प्रमुख २६७ पदाधिकारी सहभागी झाले असून त्यांत ३० महिलांचा समावेश आहे.
भाजप नेत्यांच्या उपस्थितीत संघ परिवाराचे विचार मंथन सुरू
तीन दिवसांच्या या बैठकीत सध्याची राष्ट्रीय आणि सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-09-2023 at 14:03 IST
TOPICSपुणे न्यूजPune Newsभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsमोहन भागवतMohan Bhagwatराष्ट्रीय स्वयंसेवक संघRashtriya Swayamsevak Sangh
+ 1 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rss coordination committee meeeting in the presence of bjp leaders various topics discussed pune print news apk 13 css