आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : शहरातील विविध भागांत प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अल्पवयीन वाहनचालकांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणीदरम्यान वाहनचालक अल्पवयीन असल्याचे आढळून आल्यास संबंधितांच्या पालकांना तीन वर्षाचा तुरुंगवास किंवा २५ हजार रुपयांचा दंड, अशी कारवाईचा करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

शहराच्या प्रमुख ठिकाणी आणि विशेषत: शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात १८ वर्षांखालील मुलांकडून ‘५० सीसी’ पेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकी चालविणे, दुचाकीवर तीन प्रवासी, वेगात वाहन चालविणे, कर्कश ‘हॉर्न’ वाजविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर ‘आरटीओ’कडून तपासणी मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती ‘आरटीओ’चे अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.

हेही वाचा : पिंपरी : महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी, शहराच्या ४० वर्षांच्या इतिहासात एकदाही मंत्रिपद नाही

या कायद्यान्वये होणार कारवाई?

मोटार वाहन कायदा १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार १८ वर्षांखालील वाहनचालक आढळून आल्यास वाहनाच्या मालकास शिक्षेची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी ‘५० सीसी’पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस व कलम १८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी १८ वर्षांखालील व्यक्तीस व्यावसायिक वाहन चालविण्यास मान्यता नाही. असे वाहनचालक आढळून आल्यास वाहनाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, आई वडिलांना देखील शिक्षेची तरतूद असल्याने तीन वर्षांचा कारावास किंवा २५ हजारांचा दंड भरावा लागणार आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला?

शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये मुलींचाही समावेश आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, अपघातासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने अल्पवयीन वाहनचालकांबाबत तपासणी सुरू करण्यात येणार आहे.

स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</cite>
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rto action against children driving two wheelers parents imprisonment for three year or 25000 fine pune print news vvp 08 css