लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारला आहे. आरटीओच्या ‘वायुवेग’ पथकांनी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत २० हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली आहे. प्रामुख्याने विमा नसलेली वाहने आणि विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई झाली आहे.

ST diesel buses will start in October mumbai news
ऑक्टोबरमध्ये एसटीच्या साध्या डिझेल बस दाखल होणार
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
action against vehicle owners
कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांवर कारवाई
What is the solution to the Ghodbunder road traffic
घोडबंदर रस्त्याच्या कोंडीवर उपाय काय? नवे ठाणे कोंडीचे का ठरू लागलेय? 
thane traffic police did not get Solid solution
ठाणे : वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना, नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवास नकोसा
velankanni, passengers going to velankanni,
वेलांकन्नी येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
Satara, Water storage, Koyna, Dhome,
सातारा : कोयना, धोम, उरमोडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर; प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा १४५ टीएमसीवर
Thane Multi Storey vehicle Parking
ठाणे : वागळे इस्टेटमधील बहुमजली वाहनतळाची क्षमता वाढणार

आरटीओच्या वायुवेग पथकांनी एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत २० हजार ४८२ वाहनचालकांवर कारवाई केली. वायुवेग पथकांना आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दंड वसुलीचे १५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. पथकांनी १५.०२ कोटी रुपयांची दंड वसुली करीत १००.१५ टक्के कामगिरी केली आहे. त्याआधीच्या वर्षात २०२१-२२ मध्ये दंड वसुलीचे उद्दिष्ट ११ कोटी रुपये होते आणि प्रत्यक्ष वसुली १०.५९ कोटी रुपये होती. आता दंड वसुलीच्या रकमेत ४१.९० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

सर्वाधिक कारवाई विमा नसलेल्या वाहनांवर करण्यात आली आहे. विमा नसलेल्या ५ हजार ९०३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल पाठीमागील दिवा नसलेल्या ४ हजार ४९१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ३ हजार ६९३ जणांवर कारवाई झाली आहे. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणाऱ्या १ हजार १९९ जणांवर कारवाईस सामोरे जावे लागले आहे.

सिग्नल तोडणाऱ्या आणि मार्गिका बदलणाऱ्या २ हजार ६९ वाहनांवर कारवाई झाली आहे. सीटबेल्ट न वापरणे १ हजार ९४९ जणांना महागात पडले आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या १ हजार १०२ आणि मालवाहतुकीच्या वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या २३ वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे.

आरटीओच्या वायुवेग तपासणी पथकांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने कारवाई केली जात आहे. पुढील काळातही आरटीओची कारवाई सुरूच राहणार आहे. संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे</strong>