पुणे : पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा शनिवारी (३१ ऑगस्ट) होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
लोणी काळभोर येथील एमआयटी संस्थेतील विश्वराजबाग येथे सकाळी दहा वाजता परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात सकाळी सहा वाजता हजर रहावे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या २०२२ – २३ च्या मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले.
हेही वाचा…आळंदीच्या इंद्रायणीत तरुणीने घेतली उडी; गेल्या चार दिवसात उडी घेतल्याची दुसरी घटना
लेखी परिक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांची यादी २० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. लेखी परीक्षेस एकूण पाच हजार ५५३ उमेदवार पात्र ठरले आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.