पुणे : मुदतपूर्व बदली झाल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तातडीने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट) मध्ये धाव घेतली. त्यांच्या अर्जाची तातडीने सुनावणी होऊन न्यायाधिकरणाचे सदस्य न्यायमूर्ती एस. जी. सेवलीकर आणि संतोष मेहरा यांनी बदलीला स्थगिती दिली आहे. या आदेशानंतर पुढील सुनावणी होईपर्यंत पंकज देशमुख पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत राहणार आहेत.
पंकज देशमुख यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागातून (सीआयडी) ३१ जानेवारी २०२४ रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली केली होती. ही बदली सर्वसाधारण बदली होती. त्यानंतर सात महिन्यांमध्ये त्यांची मुंबई पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली, बदली करताना त्यामागे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुढील सुनावणीपर्यंत बदली करु नये, असे आदेश न्यायाधिकरणाने दिले आहेत. देशमुख यांच्या अर्जावर पुढील सुनावणी १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
© The Indian Express (P) Ltd