पुणे : देशभरात घरांच्या किमतीतील वाढ सातत्याने कायम आहे. यामुळे घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. प्रमुख महानगरांत घरांच्या किमतीत गेल्या पाच वर्षांत सुमारे ४५ टक्के वाढ झाली आहे. मुंबईतील डोंबिवली आणि पनवेलमध्ये ही वाढ अनुक्रमे ५० व ४० टक्के असून, पुण्यातील हिंजवडीत ही वाढ ३९ टक्के आहे.

देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. त्यात देशातील दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई या सात महानगरांचा समावेश आहे. या अहवालानुसार, देशातील सात महानगरांत घरांच्या किमतीत २०१९ च्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीपर्यंत ४५ टक्के वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक वाढ बंगळुरूमध्ये बागलुरू भागात ९० टक्के आहे. बागलुरूत घरांच्या किमती पाच वर्षांत प्रतिचौरस फूट ४ हजार ३०० रुपयांवरून ८ हजार १५१ रुपयांवर पोहोचल्या आहेत.

हेही वाचा…आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे

हैदराबादमध्ये कोकापेट भागात गेल्या पाच वर्षांत घरांच्या किमतीतील वाढ ८९ टक्के आहे. या कालावधीत घरांच्या किमती प्रतिचौरसफूट ४ हजार ७५० रुपयांवरून ९ हजार रुपयांवर गेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत दिल्लीत द्वारका द्रुतगती मार्ग भागात घरांच्या किमतीतील वाढ ७९ टक्के आहे. त्याखालोखाल बंगुळुरूतील सर्जापूर रस्ता भागात ५८ टक्के, हैदराबादमधील बाचुपल्ली ५७ टक्के व तेल्लापूर ५३ टक्के, मुंबईतील पनवेलमध्ये ५० टक्के, दिल्लीतील नवीन गुरूग्राममध्ये ४८ टक्के आणि मुंबईतील डोंबिवलीत ४० टक्के अशी वाढ झालेली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले.

हेही वाचा…Pune News : दहशतवाद विरोधी पथकाचा पुण्यातील अवैध टेलिफोन एक्सचेंजवर छापा; सात सीमबॉक्स, तीन हजार सीमकार्डसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

घरांच्या किमतीत करोनानंतर वाढ सुरू झाली. गेल्या दोन वर्षांत घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत हैदराबादमध्ये घरांच्या किमतीत सर्वाधिक ६४ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल बंगळुरूत ५७ टक्के वाढ असून, दिल्ली व मुंबई ४८ टक्के आणि कोलकत्यात सर्वांत कमी २५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. – अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप

घरांच्या किमतीतील वाढ २०१९ ते २०२४

महानगर – भाग – वाढ (टक्क्यांमध्ये)

बंगळुरू – बागलुरू – ९०
हैदराबाद – कोकापेट – ८९
बंगळुरू – व्हाईटफिल्ड – ८०

हेही वाचा…जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामुळे बँकेवरील ‘आपत्ती’ टळली!  कुरकुंभमधील ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न फसला

दिल्ली – द्वारका द्रुतगती मार्ग – ७९

बंगळुरू – सर्जापूर रस्ता – ५९
हैदराबाद – तेल्लापूर – ५३
मुंबई – पनवेल – ५०
दिल्ली – नवीन गुरूग्राम – ४०
मुंबई – डोंबिवली – ४०
पुणे – हिंजवडी – ३९

Story img Loader