पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला हे धरण हंगामात प्रथमच १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातून मुठा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जलसंपदा विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : लोणावळ्यात रेकॉर्डब्रेक पाऊस! पावसाची जोरदार बॅटिंग, २७५ मिलिमीटर पावसाची नोंद

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होतो. त्यामुळे शहराला पिण्यासाठी आणि ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. तसेच या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे चारही धरणे भरून मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो. हे पाणी पुढे जाऊन उजनी धरणाला मिळते. त्यामुळे उजनी धरण भरण्यास मदत होते. यंदा मोसमी पावसाचे वेळेत आगमन होऊनही जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. जुलैच्या दुसरा आठवड्यापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चार-पाच दिवसांपासून धरणांच्या परिसरात सुरू असलेल्या जोरधारांमुळे खडकवासला हे धरण पहाटे साडेतीनच्या सुमारास १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातून मुठा नदीपात्रात दोन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. धरणांच्या परिसरात संततधार कायम असल्याने सकाळी सहा वाजता विसर्ग वाढवून ४७०८ एवढा करण्यात आला. धरणक्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Story img Loader