पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तब्बल दहा हजार ५१९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी भूसंपादनासाठी देण्यात आला असल्याने पूर्व मार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, भूसंपादन करताना आर्थिक देवाणघेवाणीच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.

जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर डॉ. दिवसे यांनी प्रथमच वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अपर जिल्हाधिकारी एच. व्ही. आरगुंडे, भूसंपादन समन्वय अधिकारी कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी या वेळी उपस्थित होते.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर
traffic servants Dombivli, concrete road work Dombivli,
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज

हेही वाचा…पुणे: औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ! आमदार आश्विनी लक्ष्मण जगतापांनी डॉक्टरांना खडसावले

रिंगरोडच्या पश्चिम मार्गावरील ३१ गावांचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन गावांच्या भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू आहे. पूर्व मार्गावर मावळातील ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे. खेड तालुक्यातील भूसंपादनाबाबत बाधीत गावांतील शेतकऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी समोर येत आहेत.

हेही वाचा…डॉक्टरची एक कोटींची फसवणूक! परदेशातील कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची बतावणी

यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीच्या तक्रारी देखील समोर येत आहेत. राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रकल्पाचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. भूसंपादन करताना प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी आल्यास खबरदार, अशी तंबी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना या वेळी दिली.

Story img Loader