पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल बेवारस रुग्णाला निर्जनस्थळी सोडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निवासी डॉक्टर आदि कुमार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. याचबरोबर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे ससूनमधील रुग्णसेवेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नीलेश हिनवटी (वय ३२, रा. मध्य प्रदेश) असे या रुग्णाचे नाव आहे. त्याच्यावर ससूनमधील अस्थिव्यंगोपचार विभागात उपचार सुरू होते. त्याला २२ जुलैला पहाटे ३ वाजता येरवडा मनोरुग्णालयासमोर सोडून दिल्याचे समोर आले आहे. निवासी डॉक्टर आदि कुमार यांनी एका कर्मचाऱ्याच्या मदतीने या रुग्णाला तिथे सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची तातडीने दखल घेत रुग्णालय प्रशासनाने डॉ. कुमार यांना निलंबित केले आहे.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
enior citizen declared brain dead and his liver donation saved persons life
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्ण मृत्यूनंतर दुसऱ्याला जीवदान देऊन गेला!
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Rescuer brother runs away by leaving mentally ill sister but nandadeep foundation save her life
रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…
urmila kothare first post after car accident
“रात्री १२.४५ च्या सुमारास माझ्या गाडीचा…”, अपघातानंतर उर्मिला कोठारेची पहिली पोस्ट; सांगितला संपूर्ण घटनाक्रम

हेही वाचा : पुणे: लहान मुलांमध्ये फ्लूची साथ! जाणून घ्या काय काळजी घ्यावी…

याप्रकरणी चौकशीसाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी समिती नेमली आहे. ही समिती रुग्ण, तक्रारदार, रिक्षाचालक, डॉ. कुमार यांचा जबाब नोंदविणार आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार आहे. या रुग्णाला आता पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रुग्ण दोन्ही पायांनी चालू शकत नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी समाजसेवा विभागाचीही मदत घेतली जात आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

हिनवटी यांचा डांगे चौक परिसरात १६ जूनला अपघात घडला होता. पायावरून बसचे चाक गेल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांना १०८ या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या रुग्णवाहिकेमधून ससूनमध्ये दाखल करण्यात आले. त्याच दिवशी शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचविले. त्यानंतर २७ जूनला दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती सुधारत असतानाच रुग्ण घरी सोडण्याची मागणी करीत होता, असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

हेही वाचा : पिंपरी : पूजा खेडकर यांना अंपगत्वाचे प्रमाणपत्र देणारे ‘वायसीएम’चे डॉक्टर अडचणीत? जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वाचा आदेश

रुग्ण बाहेर कसा गेला?

रुग्णाला मध्यरात्रीच्या सुमारास एका रिक्षातून रुग्णालयातून बाहेर नेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ससूनमधून रुग्ण बाहेर का गेला, यासह अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. हा रुग्ण दोन्ही पायांनी अधू असल्याने त्याला रिक्षापर्यंत कोणी सोडले, त्याला बाहेर सोडण्यासाठी मध्यरात्रीची वेळ का निवडण्यात आली आणि डॉक्टरांनी रुग्णाला स्वत: रिक्षात बसविले का, असेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, डॉ. कुमार यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर मार्ड संघटनेनेही याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे निवेदन दिले असून, त्यात आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

ससूनमधील बेवारस रुग्ण

शस्त्रक्रिया विभाग – १२
औषधवैद्यकशास्त्र विभाग – १९
अस्थिव्यंगोपचार विभाग – ६
कान-नाक-घसा आणि जळीत विभाग – ३
स्त्रीरोग व प्रसूती विभाग – १

हेही वाचा : पिंपरी : ‘पशुसंवर्धन’ची १३ एकर जागा पिंपरी महापालिकेकडे; ‘या’ नागरी सुविधा होणार

ससून रुग्णालयामध्ये आलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. रुग्णालयात सातत्याने गुन्हेगारी कृत्ये वाढत आहेत. त्यातून रुग्णालयाचा लौकिक खालावत आहे. ससूनच्या कारभाराबद्दल विधिमंडळ अधिवेशनातही प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ससूनमध्ये सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेण्याचे जाहीर केले. अद्याप ही बैठक झालेली नाही.

रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस</cite>

Story img Loader