महावितरणच्या प्रादेशिक नाट्यस्पर्धेत पुणे परिमंडलाच्या ‘सवाल अंधाराचा’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. कोल्हापूर परिमंडलाच्या ‘इस्किलार’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.

हेही वाचा >>>पुणे: महासाथीच्या काळात ४७ टक्के महिला कायमस्वरूपी बेरोजगार

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
black hole triple system
शास्त्रज्ञांनी लावला पहिल्या ‘ब्लॅक होल ट्रिपल’चा शोध; यातून नेमकं काय उलगडणार?
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
loksatta editorial on india china relations
अग्रलेख : मुहूर्ताची मँडरिन मिठाई!
census 2021
अन्वयार्थ : जनगणनेला मुहूर्त मिळणार?

नाट्यस्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुणे परिमंडलाने मुख्य अभियंता सचिन तालेवार निर्मित आणि अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार दिग्दर्शित ‘सवाल अंधाराचा’ ही नाट्यकृती सादर केली. प्र .ल. मयेकर लिखित या नाटकाच्या प्रभावी सादरीकरणाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकासह कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ आणि बारामती परिमंडलाचे ‘ब्लाईंड गेम’ या नाटकांच्या सादरीकरणाचे परीक्षण नाट्यपरीक्षक संजय गोसावी, अरुण पटवर्धन आणि मंजूषा जोशी यांनी केले. यामध्ये पुणे परिमंडलांचे ‘सवाल अंधाराचा’ नाटकाने प्रथम तर कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ नाटकाने द्वितीय क्रमांक पटकाविला.

हेही वाचा >>>पुणे : लम्पीमुळे दगावलेल्या २९२ जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत

पारितोषिक वितरण कार्यक्रमात महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांची मुख्य पाहुणे म्हणून उपस्थिती होती. प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, मुख्य अभियंते सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते नाट्यस्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक तालेवार यांनी केले, तर डॉ. संतोष पटनी आणि भक्ती जोशी यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी आभार मानले.

वैयक्तिक गटातील पुरस्कार
दिग्दर्शन- प्रथम – मंगेश कांबळे (कोल्हापूर), द्वितीय- राजेंद्र पवार (पुणे), अभिनय (पुरुष)- प्रथम- प्रसाद दिवाण (कोल्हापूर), द्वितीय- संतोष गहेरवार (पुणे), अभिनय (स्त्री)- प्रथम- सोनाली बावस्कर (पुणे), द्वितीय- गंगाक्का गुडुर (बारामती), नेपथ्य- प्रथम- संजय कांबळे (कोल्हापूर, द्वितीय- राजीव पुणेकर व भरत अभंग (पुणे), प्रकाशयोजना- प्रथम- गणेश लटपटे (बारामती), पार्श्वसंगीत- प्रथम- संजय नायकवडी व अभिजित टेंभुर्णे (पुणे), रंगभूषा व वेशभूषा- प्रथम- संतोष आडूळकर व सुमन पाटील (कोल्हापूर)