पुणे : डेक्कन जिमखाना परिसरात नदीपात्रात १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याची विवस्त्रावस्थेतील चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रकरणी अन्सू शर्मा (वय १९, रा. मंडई) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत १६ वर्षीय मुलाच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शर्मा आणि तक्रारदार महिलेच्या मुलाचा वाद झाला होता. महिलेच्या मुलाने मारहाण करण्यास काहीजणांना पाठविल्याचा समज शर्मा याचा झाला होता. या कारणावरुन शर्मा आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी १६ वर्षीय मुलाला डेक्कन परिसरातील नदीपात्रात नेले. तेथे त्याला पट्टा आणि बांबूने मारहाण केली. नदीपात्रात त्याला विवस्त्र करण्यात आले.

हेही वाचा – एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय

हेही वाचा – ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात दोषी कोण? अखेर सत्य येणार बाहेर

मोबाइलद्वारे चित्रीकरण करुन समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करण्यात आली. आमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुमच्या समाजाच्या समूहावर चित्रफीत प्रसारित करण्यात येईल, अशी धमकी आरोपींनी दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, डेक्कन पोलीस तपास करत आहेत.