पुणे : तृतीयपंथीयांना समाजात कायम अवहेलना सोसावी लागते. त्यांना आरोग्य सुविधा देण्याबाबतही फारसे प्रयत्न केले जात नाहीत. हे चित्र सगळीकडे दिसते. या सर्व गोष्टींना छेद देत ससून सर्वोपचार रुग्णालयाने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आहे. पुढील काळात इतरही रुग्णालयांकडून ससूनचे अनुकरण होण्याची शक्यता आहे.ससून रुग्णालयातील नवीन ११ मजली इमारतीत हा वॉर्ड आहे. त्याचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वॉर्डमध्ये २४ बेड असून, दोन अतिरिक्त आयसीयू बेड आहेत. तृतीयपंथीयांवर उपचार करण्यास अनेक रुग्णालये नकार देतात. मात्र त्यांना ससूनमध्ये अतिशय सहजपणे उपचार मिळणार आहेत. या वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना संवेदनशीलपणे वागण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. तृतीयपंथीयांना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपचाराची नवी दिशा ससूनमुळे खुली झाली आहे. पुढील काळात इतरही रुग्णालयांकडून ससूनचे अनुकरण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Monsoon Update: विदर्भ, मराठावाडा, मध्य महाराष्ट्राला ‘यलो ॲलर्ट’

तृतीयपंथीयांना उपचार घेण्यास अनेक अडचणी येतात. त्याचबरोबर त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. आर्थिक कारणांमुळे बहुतांश तृतीयपंथीय उपचारांसाठी ससून रुग्णालयात जातात. तिथे आता त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करण्यात आल्याने त्यांना भेदभावाची वागणूक मिळणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : सिल्लोड कृषी महोत्सवावर सरकारची मेहरनजर; चौकशीच्या फेऱ्यात अडकूनही ५४ लाख ७१ लाख रुपये मंजूर

पहिल्यांदा मुंबईत सुविधा

मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात पहिल्यांदा तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग होता. त्यानंतर राज्य सरकारने इतरही रुग्णालयांना याचे अनुकरण करण्याची सूचना केली होती. त्यानुसार ससून रुग्णालयाने आता पाऊल उचलत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune separate ward transgenders medical treatment sassoon hospital pune print news stj 05 css