पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्याने वाढदिवशी तलवारीने केक कापल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता या पदाधिकाऱ्याला अटक कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांचा २६ जानेवारी रोजी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त तब्बल सहा केक आणले होते. हे केक चांदेरे यांनी तलवारीने कापले. चांदेरे यांचा तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओदेखील परिसरात व्हायरल झाला होता.या प्रकारावर सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
VIDEO | तलवारीने कापला केक, शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हाhttps://t.co/2jrmCKvB4K pic.twitter.com/GBl3HDHk9G
— LoksattaLive (@LoksattaLive) January 29, 2019
अखेर पोलिसांनीही या प्रकरणी कारवाईचा बडगा उगारला आहे. तलवार बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तलवारीने केक कापणे चांदेरे यांना चांगलेच महागात पडले असून त्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे. चांदेरे हे पंचायत समितीचे माजी सदस्य असून भावी आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकवरही हाच उल्लेख होता.