पुणे : आयुर्विमा पाॅलिसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात एका कॉल सेंटरवर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींकडून पुणे परिसरातील नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के, १५ मोबाइल संच, १५० सिम कार्ड आणि वेगवेगळ्या ३० बँकांची खाते पुस्तिका, धनादेश पुस्तिका जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी शंकर कारकून पोखरकर (वय ४२, रा. कात्रज), मेहफूज मेहबुब सिद्दीकी (वय ४०, रा. औंध), अशिष रामदास मानकर (वय ४८, वाघोली) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी पोखरकर मुख्य सूत्रधार आहे. एलआयसी एजंट असल्याची बतावणी करून आरोपीने २०२१ मध्ये शिवाजीनगर भागातील एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी वास्तव्याची ठिकाणे बदलत होते. तांत्रिक तपासावरून शिवाजीनगर सायबर पथकातील पोलीस कर्मचारी आदेश चलवादी, तेजस चोपडे यांनी बनावट कॉल सेंटरचा शोध घेतला. त्यानंतर वाकडेवाडी येथे फ्यूचर ग्लोबल सर्व्हिस नावाने सुरू असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला.

Saif Ali Khan attack case, Saif Ali Khan,
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीचा चेहऱ्याच्या पडताळणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
Vitthalwadi police raided illegal hookah parlor registering case against driver and customers
उल्हासनगरमधील माणेरे गावातील हुक्का पार्लर चालकावर गुन्हा
Raid on service center that is committing online fraud under the guise of providing loans Mumbai print news
मुंबईः कर्ज देण्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सेवा केंद्रावर छापा; ७ जणांना अटक
Saif Ali Khan attack case Diamond ring stolen by attacker while working in pub
सैफ अली खान हल्ला प्रकरण : पबमध्ये कामाला असताना हल्लेखोराकडून हिऱ्याच्या अंगठीची चोरी

पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, पोलीस कर्मचारी नलिनी क्षीरसागर, आदेश चलवादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख, सरस्वती कांगणे यांनी ही कामगिरी केली.

एलआयसी ग्राहकांची माहिती

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण यापूर्वी एलआयसी पॉलिसी काढून देण्याचे काम करत होता. त्यातून त्याने एलआयसीचा ग्राहकांचा माहिती मिळविली. त्यानंतर या माहितीचा गैरवापर करुन आरोपींनी नागरिकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.

Story img Loader