पुणे : दक्षिण भारतातील कारागिरांनी सुमारे २३ वर्षांपूर्वी साकारलेली सोन्याची साडी सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला यावर्षी देखील परिधान केली. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दरवर्षी देवीच्या मूर्तीला ही तब्बल १६ किलो सोन्याची साडी परिधान केली जाते. विजयादशमीनिमित्त देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे.

सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता भाविकांची दरवर्षी गर्दी होते. त्यानुसार यंदा देखील भाविक मोठ्या संख्येने देवीचे दर्शन घेण्यासाठी आले होते.

हेही वाचा – पुणे : जनता वसाहतीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; दोघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात

हेही वाचा – आव्वाज कुणाचा?

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते. मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी यावेळी उपस्थित होते.