आपल्या लाडक्या गणरायाला राज्यभरात भाविक निरोप देत आहे. मात्र याच दरम्यान पुणे शहरातील अनेक भागात नदी मध्ये बाप्पाचे विसर्जन करतेवेळी आज दिवसभरात सहा जण बुडाल्याची घटना घडली. तर या सर्व सहा जणांना जीवनदान देण्यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचार्‍यांना यश आले आहे.

गणपती विसर्जन मिरवणुक लक्षात घेता. शहरातील नदी पात्रालगत असलेल्या विसर्जन घाटावर अग्नीशमन विभागाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आला होती. मात्र याच दरम्यान सकाळी एक तरुण वृद्धेश्वर घाटावर एक तरुण विसर्जन करतेवेळी बुडत असताना. त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात काढण्यात आले. त्यानंतर अमृतेश्वर विसर्जन घाटा परीसरात सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बोट पलटी झाल्याची घटना घडली. त्यावेळी बोटी मधील 3 पुरुषांना वाचविले. तर त्या घटनेला काही तास होत नाही. तोवर वारजे घाटावर मंडळाबरोबर आलेल्या बालाजी पवार हा विसर्जन करतेवेळी पाण्यात बुडत असताना. त्या तरुणाला अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढण्यात यश आले. तसेच मागील तीन दिवसात नऊ जणांना जीवनदान देण्यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचार्‍यांना यश आले आहे.

Story img Loader