या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागा (अ‍ॅमिनिटी स्पेस) तसेच वापराअभावी पडून असलेल्या जागांचा नागरिकांच्या आवश्यकतेनुसार वापर होण्यासाठी ‘प्लेसमेकिंग’ या संकल्पनेअंतर्गत विकास केला जाणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या या प्रकल्पाचा आर्थिक भार मात्र महापालिकेवर टाकण्यात आला असून वडगावशेरी येथील  ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड इकॉलॉजी’ या संकल्पनेसाठी चाळीस लाख तर बिबवेवाडी येथील ‘ई-लर्निग’साठी तेवढाच खर्च महापालिकेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचा खर्च महापालिकेवरच टाकण्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या ताब्यात अनेक मोकळ्या जागा आहेत. या जागांचा वापर महापालिकेकडून झालेला नाही. या जागांचा योग्य पद्धतीने वापर व्हावा आणि नागरिकांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी ‘प्लेसमेकिंग’ ही संकल्पना पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीसीसीडीसीएल) कडून मांडण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही संकल्पना देशभरात सर्वच शहरात राबविण्यात येत असल्याचा दावाही करण्यात आला. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर त्याचा सविस्तर आराखडाही करण्यात आला. प्रारंभी हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होईल, असे वाटत होते. मात्र चारपैकी दोन प्रकल्पांचा भार स्मार्ट सिटीकडून महापालिकेवर टाकण्यात आला आहे.

बाणेर येथील दोन जागांचे, वडगावशेरी आणि बिबवेवाडी येथील प्रत्येकी एका जागेचे या संकल्पनेअंतर्गत विकसन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बाणेर हा भाग स्मार्ट सिटीमध्ये (एरिया डेव्हलपमेंट-क्षेत्र विकास) घेण्यात आला आहे. येथील दोन्ही मिळून अडीच हजार चौरस मीटर जागेत ई-लर्निग आणि स्कील डेव्हलपमेंट तसेच लिजियर आणि मेडिटेशन ही संकल्पना विकसित केली जाणार आहे. बिबवेवाडी येथेही ई-लर्निग तर वडगावशेरी येथे इनोव्हेशन अ‍ॅण्ड इकॉलॉजी ही संकल्पना मोकळ्या जागेवर आकार घेणार आहे. सर्व वयोगटातील नागरिकांना उपयुक्त ठरेल, अशी संकल्पना या प्लेसमेकिंगमागे असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

हे प्रकल्प पथदर्शी स्वरूपात राबविण्यात येत असले, तरी त्याचा खर्च मात्र पीसीसीडीसीएलकडून महापालिकेवर टाकण्यात आला आहे. वडगावशेरी येथील दोन हजार १८९ चौरस मीटर जागेवर ही संकल्पना राबवण्यात येणार असून अ‍ॅम्फी थिएटर, पर्यावरण अभ्यास आणि प्रदर्शन केंद्र, कार्यशाळांसाठी जागा आणि फुलपाखरू उद्यान करण्यात येणार आहे. बिबवेवाडी आणि वडगावशेरी येथील जागांवरील कामांसाठी एक कोटी साठ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही राबविण्यात येणार असल्याची माहिती भवन विभागाकडून देण्यात आली.