पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड परिसरात दोन एसटी बसचा अपघात झाला. अपघातात महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. एसटी बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी झाले असून, तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नामदेव बाबुराव आढाव (वय ७८, रा. चिंचपूर, आष्टी, जि. बीड ), सुवर्णा संतोष होले (वय ३८, रा. बिरोबावाडी, पाटस, ता. दौंड) अशी मृत्युुमुखी पडलेल्यांची नावे आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड परिसरात सोमवारी सायंकाळी अपघात झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे: जिल्ह्यावर वर्चस्व कोणत्या ‘राष्ट्रवादी’चे? २१ पैकी ७ मतदारसंघांत राष्ट्रवादी (शरद पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (अजित पवार) लढती

पुण्याहून सोलापूरकडे एसटी बस निघाली होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले. बस दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या तुळजापूर-पुणे मार्गावरील एसटी बसवर आदळली. अपघातात दोन्ही बसमधील चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले. बसमधील ४० ते ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गु्न्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune solapur highway two st buses accident two died on the spot 40 to 50 passengers injured pune print news rbk 25 css