पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आईला दांडक्याने बेदम मारहाण करून तिचा खून केला. ही घटना १३ ते १५ मे दरम्यान येरवड्यात घडली असून, याप्रकरणी मुलासह नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगल मोहन नेटके (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयूर मोहन नेटके (रा.येरवडा) आणि अल्पवयीने नातवावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मंगल नेटके यांची भाची संध्या अरुण वाघमारे (वय ५०) यांनी तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंगल नेटके यांना मुलगा मयूर नेटके याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. परंतु तिने पैसे न दिल्याच्या रागातून मयूर आणि अल्पवयीने नातवाने तिला दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने मंगलला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; लोखंडी होर्डिंग कोसळले

हेही वाचा – संजोग वाघेरे समर्थकांची फ्लेक्सबाजी, ‘या’ भागात लागले विजयाचे फलक

हांडेवाडीत तरुणाचा खून

हडपसर परिसरातील हांडेवाडी येथील रिदम सोसायटी समोरील मोकळ्या जागेत अज्ञाताने हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा खून केला. राजेंद्र रामभाऊ शेजुळ (वय ३५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भाग्यश्री राजेंद्र शेजुळ (वय २९) यांनी  हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस पांढरे तपास करत आहेत.