पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. या सुनावणीसाठी राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार-आमदारांविरोधातील दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी यांना हजर राहण्याबाबत शुक्रवारी (१० जानेवारी) तारीख देण्यात आली होती. त्यानुसार राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर झाले.

हेही वाचा : पुणे : तोल जाऊन पडल्याने रंगकाम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू, ठेकेदाराविरुद्ध गु्न्हा दाखल

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. दाव्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी राहुल गांधी यांच्या वतीने वकील अड. मिलिंद पवार यांनी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने अर्ज मंजूर केला. पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune special court grant bail to rahul gandhi in veer savarkar defamation case pune print news rbk 25 css