Rahul Gandhi Veer Savarkar Defamation Case : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. गांधी यांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ते प्रचारात व्यस्त असल्याने न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर गांधी यांना २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिले.

लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी गांधी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. यापूर्वी गांधी यांना विशेष न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविण्यात आले होते. संबंधित समन्स दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाऐवजी पातियाळा येथील न्यायालयात पोहोचल्याने ते पुन्हा पुण्यातील न्यायालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर गांधी यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार गांधी यांना सोमवारी (१८ नोव्हेंबर) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

polling day security pune
पुणे: मतदानाच्या दिवशी कडक बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्रांत सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात
pune minor drunk driver accident
Pune Accident: मद्याच्या नशेत मोटार चालवून अभियांत्रिकीचे शिक्षण…
Vinesh Phogat bats for women safety in Maharashtra Assembly Election 2024
विधानसभा निवडणुकीसाठी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगट यांनी केले ‘ हे ‘ आवाहन !
Ajit Pawar, Mission Maidan, Ajit Pawar Baramati,
मला मत म्हणजे भाजपला नव्हे! अजित पवार यांच्याकडून आरोपांचे खंडन
Gajendra Singh Shekhawat, Gajendra Singh Shekhawat pune, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीने कल्याणकारी योजनांना स्थगिती दिल्याने राज्याचा विकास खुंटला – केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचा आरोप
Murlidhar Mohol, Western Maharashtra seats,
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा दावा
Sharad Pawar, Yugendra Pawar, Ajit Pawar,
देशात बारामतीची ओळख कोणामुळे? शरद पवार यांनी अजित पवारांना सुनावले
Vinesh Phogat pune, Vinesh Phogat,
क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना हा त्रास होऊ नये – विनेश फोगट
investment fraud in stock market 75 lakh fraud by cyber thieves Pune news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस; सायबर चोरट्यांकडून ७५ लाखांची फसवणूक

हेही वाचा : पुणे: मतदानाच्या दिवशी कडक बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्रांत सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात

संबंधित समन्स गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. याबाबतची कागदोपत्री पोहोच सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात सादर केली. समन्स मिळाल्यानंतर गांधी न्यायालयात हजर राहिले नसल्याचे ॲड. कोल्हटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद पवार यांनी न्यायालायत अर्ज केला. गांधी प्रचारात व्यस्त असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. संबंधित समन्स गांधी यांच्या कार्यालयात पोहाेचले आहे, असे ॲड. पवार यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने ॲड. पवार यांच्याकडून हमीपत्र घेतले. गांधी हे २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहतील, असे हमीपत्रात म्हटले आहे.