पुणे : पुणे शहर, परिसरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. बेशिस्त वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवित असल्याने गंभीर अपघात घडतात. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांचे वाहन सहा महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी माेहिम राबविण्यात येते. कारवाई करूनही वाहनचालक सर्रास वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून आले. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाइलवर संभाषण, एकाच दुचाकींवरुन तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), मद्य पिऊन वाहन चालविणे, मोटार चालविताना आसनपट्टा (सीट बेल्ट) न लावणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविताना आढळून आल्यास वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल, तसेच सहा महिन्यांसाठी वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड: आयात उमेदवाराच आम्ही काम करणार नाहीत; शिवसेना ठाकरे गटाचा सर्वानुमते ठराव, पक्ष काय भूमिका….

u

वाहतूक पोलिसांकडून गेल्या पंधरा दिवसात २५ हजारांहून जास्त बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. शहरात गंभीर स्वरुपांचे अपघाताचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक पोलीस दिवसभरात दोन सत्रात काम करतात. वाहतूक शाखेतील ८५० पोलीस कर्मचारी दोन सत्रात विविध चौकात वाहतूक नियमन करतात. वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर अपघात घडतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. शहरात गंभीर अपघातात दररोज दोन ते तीन गंभीर अपघात घडतात, असे त्यांनी नमूद केले.

अवजड वाहनांना बंदी

शहर, तसेच उपनगरात बांधकामे सुरू आहेत. सिमेंट वाहतूक करणारे डंपर, काँक्रीट मिक्सर अशा अवजड वाहनांमुळे गंभीर अपघात घडतात. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा – वस्तूंच्या पुनर्वापरासाठी…

पंधरा दिवसात केलेली कारवाई

विरुद्ध दिशेने जाणारे वाहनचालक – २१ हजार २८५

ट्रिपल सीट – दोन हजार ८७२

मद्य पिऊन वाहन चालविणे : ५७०

जप्त करण्यात आलेली वाहने – २१५

(कारवाईची आकडेवारी १ ते १६ ऑक्टोबरपर्यंतची)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune strict action will be taken against those driving in the opposite direction pune print news rbk 25 ssb