पुणे : गेले दोन दिवस पुणे आणि धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसाने आज पुणेकरांची झोप उडविली. धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर नदीचा विसर्ग करण्याचा निर्णय मध्यरात्री घेण्यात आला आणि त्या नंतर सिंहगड रस्त्यावरील जनजीवन विस्कळीत झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रात्री अचानक पाणी सोडल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील नदीपात्रातालगत असलेल्या वस्तीत पाणी शिरले. पाणी सोडले बाहेर पडा इतके सांगून लोक बाहेर पडू लागले. हातात येईल ते सामान घेऊन बाहेर पडणार तोच तुफान वेगाने पाणी पात्रालगत असलेल्या सोसायटी आणि घरात शिरले. पाण्याचा वेग इतका होता की नागरिक हातात घेतलेल्या वस्तू तेथेच टाकून जीव वाचवण्यासाठी बाहेर पडू लागले.

हेही वाचा…पुणे : शहरातील पूल झाले ’पिकनिक स्पॉट’, मुठेचा पूर पाहण्यासाठी अलोट गर्दी

जलविहर, जलपूजन, एकता नागरी, पूजा पार्क, प्रगती पार्क, राधाकृष्ण विहार, निंबज नगर, रिव्हर व्ह्यू अशा सर्व सोसायटीत कंबरेइतके पाणी होते. सोसायटीमध्ये तरुणांनी मोठ्या मुश्किलीने ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढले. यापूर्वी नागरिक बाहेर पडत नव्हते. मात्र यावेळी लोक स्वतःहून बाहेर पडत होते. बाहेर पडल्यावर मात्र सगळ्यांचा पालिका प्रशासनावर राग व्यक्त करत होते.

एक रहिवासी जाधव काकू म्हणाल्या, खूप दिवसांनी पाणी आले. टाकलेले भराव बांधलेली भिंत यामुळे गेली काही वर्षे पाणी येत नव्हते. या वेळी आले. आमच्या घरात सकाळी पाणी शिरल्यावर कळले. आधी सूचना आली असती तर काहीतरी करता आले असते.

धरवाटकर कुटुंबीय देखील प्रशासनावर चिडले होते. पाणी अचानक सोडत नाहीत मग इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यापूर्वी सूचना करायला हव्या होत्या. सगळे अचानक आल्याने आम्हाला काहीच करता आले नाही. तळमजल्यावर घर आल्याने मोठे नुकसान झाले आता ते कोण भरून देणार.

उपाययोजना झाल्यामुळे पाणी येणार नाही असेच गृहीत धरले होते. पण यावेळी अचानक पाणी जास्त सोडण्यात आले आणि याची पूर्वकल्पना देण्यात आली नाही. ती द्याला हवी होती, असे दांडेकर म्हणाल्या.

हेही वाचा…Pune Rain Update : भिडे पुलासह शहरातील भुयारी मार्ग वाहतुकीस बंद

हा सारा प्रसंग तीन चार तास चालू होता. अरुंद रस्ते, आशीचे दोन्ही बाजूकडील पार्किंग आणि पाण्याच्या भीतीने वाढलेले पार्किंग यामुळे अग्निशामक गाड्या ठिकाणापर्यंत येऊ शकत नव्हत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी लांब गाडी लावत चालत येऊन कार्याला सुरुवात केली. पाणी वेगाने वाढू लागल्यावर मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके एकतानगर मध्ये एक टीम तैनात करण्यात आली. पण तोवर विसर्ग बंदच केल्याने ह्या टीमला तसेच परतावे लागले.

पाण्याचा विसर्ग केवळ ९ हजार क्युसेक्स इतकाच होता. म्हणून संध्याकाळी मेसेज टाकला नाही. पण पहाटे तीन वाजता जशी माहिती मिळाली तेव्हापासून मी घटनास्थळी उपस्थित आहे, असे नगरसेविका मजुषा नागपुरे म्हणाल्या.

हेही वाचा…Pune Rain : “आम्हाला न सांगता एवढं पाणी का सोडलं?” पुण्यातील महिलेनं थेट आयुक्तांनाच विचारला जाब; म्हणाल्या, “त्यांना इथे बोलवा”!

पालिका प्रशासनाने आधी सूचना द्यायला हवी होती. नागरिकांना काच सूचना नसल्यामुळे सकाळी अचानक पाणी आल्यामुळे त्यांची तारांबळ उडाली, असे नगरसेवक श्रीकांत जगताप म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune sudden night water release from dam floods sinhagad road residents criticize lack of warning pune print news dpb 28 psg