इन्फोसिसमध्ये काम करणाऱया एका कर्मचाऱयाने गुरुवारी रात्री पुण्यात डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. विवेक लक्ष्मीनारायण पोतदार (२९) असे कर्मचाऱयाचे नाव आहे. पोतदार हे इन्फोसिसमध्ये वित्त विभागात काम करीत होते.
वारजे परिसरातील शांतीनिकेतन सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. पोतदार हे मुळचे मध्य प्रदेशातील असून, ते नोकरीच्या निमित्ताने शांतीनिकेतन सोसायटीमध्ये राहात होते. घरामध्ये कोणीही नसताना त्यांनी डोक्यात गोळी झाडली. त्यांचा मित्र रात्री अकराच्या सुमारास परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पोतदार याचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्यामध्ये गुरुवारी संध्याकाळी एका क्रमांकावरून मिस्ड कॉल आल्याचे आढळून आले आहे. पोलिस याप्रकरणी तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune suicide of employee working in infosys
Show comments