शिरुर : स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याच्या मुसक्या अखेर पोलीसांनी आवळल्या आहेत . पोलीसांनी ताब्यात घेण्यापूर्वी ग्रामस्थ गणेश गव्हाणे यांनी अटके पूर्वीचे नाट्य सांगताना सांगितले की आरोपी गाडे याला पकडण्यासंदर्भात ग्रामस्थांनी पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन केले होते .त्यानुसार ग्रामस्थ ही गाडेचा शोध घेत होते . ज्या ठिकाणी रात्री आरोपी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे पोलीस व ग्रामस्थ आपल्या मागावर असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने चकवा दिला .
दरम्यान आरोपी गाडेचा शोध घेत असताना ड्रोन वारंवार सूचना देत होते. गव्हाणे म्हणाले की मी मोटार सायकल वरुन गाडे याचा शोध घेत असताना गाडीच्या प्रकाशात गावातील क्रिकेट मैदानाचा जवळील विहीरीच्या लगत असलेल्या हिरव्या नेट जवळ गाडे दिसला. गाडीचा प्रकाशाने तो उठला तो म्हणत होता की मला माझ्या मुलाशी बोलू द्या. त्याच्या हातात रोगरची बाटली होती ती काढून घेतली. पोलीस पाटील यांना फोन केला व पोलीस आले व ते गाडे यास घेवून गेले .
स्वारगेट बसस्थानका मधील शिवशाही मध्ये युवतीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपी दतात्रेय गाडे यांच्या गुनाट गावात पोलीसांच्या १० पथकातील १०० हून अधिक पोलिसांनी, श्वान पथकासह तीन ड्रोनच्या सहाय्याने स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेत गाडे याला शोधण्यासाठी शोध मोहीम राबविली होती . मोठ्या संख्येने पोलिसाच्या फौजफाटा गुनाट परिसरात गाडे याचा शोध घेत होते .
पोलिसांनी व स्थानिकांनी गुनाट निर्वी रस्त्यांवरील उसाच्या शेतासह अन्य भागात आरोपी गाडे यांचा शोध घेतला. तीन ड्रोन ही या परिसरात पोलीसाच्या शोध मोहिमेत होते. सहपोलीस आयुक्त रजतकुमार शर्मा यांच्या सह वरिष्ठ पोलीस अधिकारी निखील पिंगळे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आदी घटनास्थळी ठाण मांडून होते.
आरोपी दत्तात्रेय गाडे यांची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असून पत्नी व आठ वर्षाचा मुलगा असून त्याचे आई वडील शेतात काम करतात एक भाऊ आहे . गाडे यांच्या पत्नी या खेळाडू असून काही वर्षा पूर्वी पोलीस भरती साठी ही प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले . गाडेवर चोरीच्या गुन्हा सह अन्य गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहे.