पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी महिलांच्या पिशवीतून दागिने चोरणाऱ्या दोघींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ८८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. दुर्गा अविनाश उपाध्याय (वय ३०, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक), लक्ष्मी भिवा सकट (वय २५, मूळ रा. होम मैदानाजवळ, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी महिलांकडील ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. उपाध्याय आणि सकट सध्या खडकीतील म्हाडा काॅम्प्लेक्स परिसरात राहायला आहेत. स्वारगेट एसटी स्थानक परिसरात त्यांना संशयास्पद फिरताना गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने पाहिले. संशयावरून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांकडील ऐवज चोरून नेल्याची कबुली दिली.

हेही वाचा : ‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी

त्यांच्याकडून चार लाख ८८ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोघींनी स्वारगेट एसटी स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज चोरून नेण्याचे पाच गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, मोराळे, तनपुरे, घुले, पवार, शिंदे, टोणपे यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader