पुणे : टाटा समूहातील टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड (टीएएसएल) ही कंपनी देशात एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स बनवणारी आघाडीची खासगी कंपनी आहे. या कंपनीने पुण्यामध्ये ३० नोव्हेंबरला वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. टीएएसएलच्या हैदराबाद आणि बंगळुरूतील प्रकल्पांमधील विविध पदांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार असून त्या पुण्यात होणार आहेत.

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीकडून हैदराबादमधील उत्पादन प्रकल्पात विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने तांत्रिक पदांचा समावेश असून, त्यात असेंब्ली मेकॅनिकल, इलेक्ट्रिक असेंब्लर, ग्राउंड टेस्ट-इलेक्ट्रिकल अँड एव्हियॉनिक्स आणि ग्राउंड टेस्ट – मेकॅनिकल सिस्टिम्स या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी संबंधित क्षेत्रातील ३ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक असेल. यासाठी उमेदवार एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग अथवा पदविधारक असणे अपेक्षित आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
indian express thinc our cities event
सहज, स्वस्त तंत्रज्ञानाची गरज ; इंडियन एक्सप्रेसच्या ‘थिंक – सिटीज’ परिसंवादात तज्ज्ञांचे मत
IAF Agniveervayu Recruitment 2025 Notification out at agnipathvayu cdac in registration begins on January 7
IAF Agniveervayu Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अग्निवीर वायू पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Tata Technologies Recruitment 2024 Vacancies Process Criteria in Marathi
तरुणांसाठी खुशखबर! TATA कंपनीत नोकरीची संधी; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
Strict rules for SME IPOs SEBI steps in to protect interests of small investors print eco news
‘एसएमई आयपीओ’संबंधी नियम कठोर; छोट्या गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी ‘सेबी’चे पाऊल
NTA recruitment 2024 Multiple vacancies with salaries up to Rs 60000
NTA recruitment 2024 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये नोकरीची संधी! ६०,००० रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, तातडीने करा अर्ज
itc shareholders marathi news,
‘आयटीसी’च्या भागधारकांना लवकरच नवीन हॉटेल कंपनीच्या समभागांचा नजराणा

हेही वाचा : राज्यात ओबीसी मुख्यमंत्री होण्याबाबत छगन भुजबळ काय म्हणाले?

याचबरोबर कंपनीच्या बंगळुरूतील प्रकल्पातही विविध जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यात क्वालिटी इन्स्पेक्टर मेकॅनिकल, क्वालिटी इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल आणि पेंटर या पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी शैक्षणिक अर्हता एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग अथवा पदविधारक असणे अपेक्षित आहे. याचबरोबर उमेदवाराला किमान ३ ते ५ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असावा, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

मुलाखती कधी अन् कुठे?

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीकडून वरील सर्व पदांसाठी मुलाखती ३० नोव्हेंबरला घेण्यात येणार आहेत. लेमन ट्री प्रिमियर, सिटी सेंटर, कॅनॉट रोड, पुणे येथे या मुलाखती होणार आहेत. या मुलाखतींची वेळ सकाळी ९.३० वाजता ते सायकाळी ५.३० वाजेपर्यंत असेल.

हेही वाचा : देशात लोकशाहीचे वस्त्रहरण; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे उपोषण

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडविषयी…

जागतिक पातळीवरील आघाडीच्या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपन्यांसोबत भागीदारी करून टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीतील एक अविभाज्य सहयोगी आहे. आघाडीच्या डिफेन्स ओईएम कंपन्यांसाठी ही कंपनी ग्लोबल सिंगल सोर्स प्रोव्हायडर आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने म्हटले आहे की, कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देते. सर्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याधुनिक सेवासुविधा उत्पादने विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या ज्ञान व अनुभवाचा वापर करता यावा यासाठी पूरक वातावरण पुरवण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे.

Story img Loader